ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे ! मलिक यांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 22:20 IST2021-11-10T22:20:05+5:302021-11-10T22:20:52+5:30

Nagpur News नबाब मलिक यांच्या आरोपांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

Enough of what you said in the tweet! Fadnavis's reaction to Malik's allegation | ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे ! मलिक यांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे ! मलिक यांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

ठळक मुद्देएस. टी.च्या आंदोलनावरुन सरकारवर निशाणा

नागपूर : नबाब मलिक यांच्या आरोपांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही आरोपांना उत्तर दिले असून, मलिकांच्या आरोपांना यापेक्षा अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्याकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान फडणवीस यांचे बुधवारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. या आरोपांसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. यापूर्वी केलेल्या एका ट्विटमधून त्यांनी डुकरासोबत कुस्ती खेळली तर चिखल आपल्याच अंगावर येणार, असे म्हटले होते. या ट्टिटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, असे सांगून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक उत्तरे देण्याचे टाळले.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, सरकार दडपशाही करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे आंदोलन अधिक पेटून उठेल. एस. टी. कर्मचाऱ्यांना सरकारने काहीतरी मदत द्यायला हवी, असे ते म्हणाले.

Web Title: Enough of what you said in the tweet! Fadnavis's reaction to Malik's allegation