शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कॉपीद्वारे उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:44 IST

पोटाच्या आजारावरील उपचारासाठी एण्डोस्कोपी वरदान ठरत आहे. एण्डोस्कोपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कोपीद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. एका प्रकरणात अन्ननलिकेचा कॅन्सरने पीडित रुग्णामध्ये एण्डोस्कोपीद्वारे तोंडावाटे स्टेंट टाकून बंद झालेल्या अन्ननलिकेचा मार्ग खुला करण्यात यश आले, अशी माहिती अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा यांनी दिली.

ठळक मुद्देकुलविंदर दुवा यांची माहिती : दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन-२०१८’ परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोटाच्या आजारावरील उपचारासाठी एण्डोस्कोपी वरदान ठरत आहे. एण्डोस्कोपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कोपीद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. एका प्रकरणात अन्ननलिकेचा कॅन्सरने पीडित रुग्णामध्ये एण्डोस्कोपीद्वारे तोंडावाटे स्टेंट टाकून बंद झालेल्या अन्ननलिकेचा मार्ग खुला करण्यात यश आले, अशी माहिती अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा यांनी दिली.मिडास मेडिकल फाऊंडेशन व रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने आयोजित ‘गॅस्ट्रोकॉन-२०१८’परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. या परिषदेच्या औपचारिक उद्घाटनानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. दुवा म्हणाले, एण्डोस्कोपीच्या नव्या टेक्नालॉजीमुळे शस्त्रक्रियेच्या तुलनेत अत्यल्प खर्च येतो. रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते तसेच शरीराची कुठेही चिरफाड केली जात नाही. त्यामुळे रुग्णाची शारीरिक हानी होत नाही.अन्ननलिकेच्या पुनरुत्पादनाला यशडॉ. दुवा म्हणाले, अन्ननलिकेच्या पुनर्जननच्या (रिजनरेशन) प्रयत्नाला पहिल्यांदाच यश प्राप्त झाले. प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच दुसऱ्या  पेशींना जन्म देणाºया मूळपेशींमुळे हे शक्य झाले. एका २४ वर्षीय युवकाला अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्याने पाच सेंटीमीटरपर्यंत अन्ननलिका कापावी लागली. अन्ननलिका व पोटाचा आकार कायम ठेवत कापलेल्या जागी स्टेंट टाकण्यात आली. चार वर्षानंतर स्टेंटच्या जागेवर अन्ननलिकेचे ‘रिजनरेशन’ झाल्याचे आढळून आले.अ‍ॅसिडिटीवरील औषधांनी मूत्रपिंड निकामी होऊ शकतेडॉ. दुवा म्हणाले, अ‍ॅसिडिटीवर ६० टक्के लोक विना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतात. हे घातक ठरू शकते. कारण अ‍ॅसिडिटी ही अ‍ॅसिडिटी असतेच असे नाही, ती एखाद्या गंभीर आजाराची लक्षणेही असू शकतात. अ‍ॅसिडिटीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात. मूत्रपिंड निकामी होणे, डिमेन्शिया होणे, हाडे ठिसूळ होणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात.लिव्हर सिरोसिसवर प्रभावी औषधे उपलब्ध - डॉ. श्रीकांत मुकेवारमिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. श्रीकांत मुकेवार म्हणाले, ‘लिव्हर सिरोसिसवर’ प्रभावी औषध उपलब्ध झाल्याने आता सिरोसिस सामान्य होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ७५ सिरोसिसच्या रुग्णांवर औषधोपचारानंतर त्यांची ‘बायोप्सी’ केल्यानंतर ७० टक्के सिरोसिस सामान्य झाल्याचे सामोर आले आहे. योग्य औषधोपचारांमुळे लिव्हर (यकृत) प्रत्यारोपण टाळणेही शक्य झाले आहे.‘फॅटी लिव्हर’चा धोका लक्षात घ्या-डॉ. सौरभ मुकेवारडॉ. सौरभ मुकेवार म्हणाले, लिव्हर (यकृत) स्थुलता (फॅटी) असणे हे सामान्य मानले जाते. परंतु असे नाही, फॅटी लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा आजार बळावत आहे. अत्यंत गंभीर यकृताच्या आजराच्या कारणांपैकी हा आजार समोर आला आहे. ‘फॅटी लिव्हर’ हा आजार रोखता येण्यासारखा आहे. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात केवळ जीवनशैलीत बदल करावा लागतो. नियमित व्यायाम व स्थुलतेवर लक्ष ठेवल्यास हा आजार उद्भवत नाही.दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन’ परिषदेत देशातून जवळपास १००० डॉक्टर सहभागी झाले आहेत. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्यासह डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख, डॉ. आनंद तोडगी, पवन लापसेटवार, विजय सालंकर, विजय वर्मा, डॉ. अभय लांजेवार, डॉ. सुरेश जळगावकर आदी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर