जूनअखेरपर्यंत १७00 हे. सिंचन क्षमतेचे लक्ष्य

By Admin | Updated: May 10, 2014 01:29 IST2014-05-10T01:29:58+5:302014-05-10T01:29:58+5:30

जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पातून जून महिन्यापर्यंत १७00 हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे लक्ष्य जलसपंदा विभागाने ठेवले आहे.

By the end of June 1700 o The goal of irrigation potential | जूनअखेरपर्यंत १७00 हे. सिंचन क्षमतेचे लक्ष्य

जूनअखेरपर्यंत १७00 हे. सिंचन क्षमतेचे लक्ष्य

नागपूर : जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पातून जून महिन्यापर्यंत १७00 हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे लक्ष्य जलसपंदा विभागाने ठेवले आहे. दरम्यान पुढच्या काळात बांधण्यात येणार्‍या पाच पैकी एका प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील ७३ सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. यात एक मोठा, १0 मध्यम आणि ६२ लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. यातून १ लाख ३६ हजार ८८९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा दावा, जलसंपदा विभागाने (मुख्य अभियंता) केला आहे.
सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात २0 प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाची अपेक्षित सिंचन क्षमता ६४ हजार ९९२ हेक्टर असून मागील वर्षीपर्यंत म्हणजे जून २0१३ पर्यंत ३२ हजार ६0१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. २0१३-१४ या वर्षी २0 प्रकल्पांसाठी ९३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जून २0१४ अखेपर्यंत १७00 हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे उदिष्ट जलसंपदा विभागाने ठेवले आहे. २0१४-१५ या वर्षी सिंचन प्रकल्पांसाठी १३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार कामे केली जात आहेत, असे जलसंपदा विभागातील सूत्रांनी सांगितले.
भविष्यात पाच मोठे प्रकल्प हाती घेण्याचा जलसंपदा विभागाचा विचार आहे. यापैकी ९१९ हेक्टर सिंचन क्षमता असणार्‍या एका प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून उर्वरित चार प्रकल्पांचे प्रस्ताव सर्वेक्षणाधीन आहे. या प्रकल्पांमधून २८,५८१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. (प्रतिनिधी)

Web Title: By the end of June 1700 o The goal of irrigation potential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.