२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 19:21 IST2023-06-01T19:21:08+5:302023-06-01T19:21:26+5:30
नागपूर वनविभागाची बुटीबाेरी क्षेत्रात कारवाई

२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले
नागपूर : वनविभागाच्या पथकाने गुरुवारी अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करीत बुटीबाेरी क्षेत्रात अतिक्रमण केलेली २१.१० हेक्टर जमिन ताब्यात घेतली. या जमिनीवर काहींनी शेती तर काहींनी प्रतिष्ठान थाटले हाेते. विभागाने जेसीबीच्या मदतीने हे संपूर्ण अतिक्रमण रिकामे केले.
नागपूर वनविभागाअंंतर्गत बुटीबाेरी वनपरिक्षेत्रातील साेनेगाव नियतक्षेत्रात ही कारवाई केली गेली. यामध्ये वनविभागाने माैजा आष्टा येथील १०.१० हेक्टर, माैजा तामसवाडी येथे ५ हेक्टर व माैजा चिचकाेटा येथील ६ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण हटविले. यावेळी पथकाला विराेधाचाही सामना करावा लागला हाेता. नागपूर प्रादेशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, नागपूरचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात उमरेडचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, बुटीबाेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमाेद वाडे, क्षेत्र सहायक एस.बी. केकान, एम.आर. मुंडे, वनमजूर पी.एल. झाडे यांनी ही कारवाई केली.