सीताबर्डीत अतिक्रमण कारवाई, अंदाजे १ ट्रक साहित्य जप्त
By मंगेश व्यवहारे | Updated: September 26, 2023 14:56 IST2023-09-26T14:55:58+5:302023-09-26T14:56:55+5:30
रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले

सीताबर्डीत अतिक्रमण कारवाई, अंदाजे १ ट्रक साहित्य जप्त
नागपूर : धरमपेठ झोनतर्फे सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहा पूलपर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. कारवाईत फुटपाथ व अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक ते झेंडा चौक, चिटणीस पार्क चौक, अग्रेसन चौक, मेयो हॉस्पिटल, तिन नल चौक, इतवारी मार्केट, शहीद चौक, गांधी पुतळा, नाईक तलाव, मारवाडी चौक, मस्कासाथ, आझमशहा चौक पर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
कारवाईत अंदाजे १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्येही आयटी पार्क ते त्रिमूर्तीनगर, जयताळा रोड, आठ रस्ता चौक, बजाजनगर पर्यंत कारवाई करण्यात आली. परिसर मोकळा करण्यात आला. ही कारवाई सहा. आयुक्त हरिष राऊत, प्रवर्तन अधिक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात विनोद कोकार्डे, भास्कर माळवे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.