ट्रॅव्हल्स कंपनीतील कर्मचाऱ्याने केला १८ लाखाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:39 IST2020-10-24T20:38:47+5:302020-10-24T20:39:51+5:30
Travel company employee fraud , Crime news, nagpur ट्रॅव्हल्स कंपनीच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटने ग्राहकांकडून इंटरनॅशनल टूरसाठी पैसे गोळा करून, गोळा झालेले पैसे कंपनीत न भरता स्वत:साठी वापरून १८ लाख रुपयांचा अपहार केला.

ट्रॅव्हल्स कंपनीतील कर्मचाऱ्याने केला १८ लाखाचा अपहार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रॅव्हल्स कंपनीच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटने ग्राहकांकडून इंटरनॅशनल टूरसाठी पैसे गोळा करून, गोळा झालेले पैसे कंपनीत न भरता स्वत:साठी वापरून १८ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारकर्ता मनोज शिवप्रसाद गुप्ता (३६) रा. हिवरीनगर यांची सी हॉलिडे नावाने ट्रॅव्हल्स कंपनी आहे. येथे आरोपी शिलेंद्र सुखदास सहारे (३६) रा. विवेकानंद कॉलनी, गोंदिया हा कार्यरत आहे. त्याने ग्राहकाकडून इंटरनॅशनल टूरच्या नावाने १८ लाख रुपये गोळा केले. हे पैसे त्याने स्वत:वर खर्च केले. ही बाब तक्रारकर्त्याच्या लक्षात आल्याने त्यांनी आरोपीकडून नोटराईज शपथ पत्रावर गुन्हा कबूल करून घेतला व १८ लाखाचे ५ चेक आरोपीने त्यांना दिले. परंतु ते सर्व चेक बाऊन्स झाल्याने तक्रारकर्त्याने पोलिसात तक्रार केली. प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.