नागपुरात कंपनीत काम करताना खाली पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 21:57 IST2020-05-22T21:56:14+5:302020-05-22T21:57:52+5:30
कंपनीत साफसफाईचे काम करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका कामगाराचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात कंपनीत काम करताना खाली पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंपनीत साफसफाईचे काम करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका कामगाराचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप चंद्रभूषण बरिये ( वय ३३, रा. भीमनगर) असे मृताचे नाव आहे. ते बजाज इंटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत साफसफाईचे काम करीत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे ४.३० वाजता ते कंपनीत घोडीवर चढून साफसफाईचे काम करत असताना खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना इतर मजुरांनी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी बरिये यांना तपासून मृत घोषित केले. तुषार अंकुश खैरकर (वय ३५, रा. बेलतरोडी) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.