शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

विद्यार्थिनीवर अत्याचार करून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’, ‘इन्स्टाग्राम फ्रेंड’ला अटक

By योगेश पांडे | Updated: July 3, 2023 18:03 IST

नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : एका अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘इन्स्टाग्राम’वर एका तरुणाशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली. संबंधित आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अगोदर अत्याचार केले. तिने लग्नाची विचारणा केली असता त्याने ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करत तिला धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ऋषभ विनेश उंदीरवाडे (२४, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. ऋषभचे लग्न झाले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याची १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला प्रेम करतो असे सांगितले व तिनेदेखील होकार दिला. त्याने तिच्यापासून लग्न झाल्याची बाब लपवून ठेवली होती. १२ मे ते २२ मे या कालावधीत त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

काही दिवसांअगोदर तिने त्याला परत विचारले असता त्याने नकार दिला. यावरून मुलीने त्याच्यापासून संबंध तोडत असल्याचे सांगितले. यावरून संतापलेल्या ऋषभने ‘तू मला सोडून गेली तर मी स्वत:चे बरेवाईट करेन व तुझ्या घरच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात फसवेन’, अशी धमकी दिली. यामुळे हादरलेल्या विद्यार्थिनीने घरच्यांना या प्रकाराची माहिती दिली. तिने नवीन कामठी पोलीस ठाण्यात ऋषभविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूरArrestअटक