आणीबाणीतील कैद्यांना मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:02 PM2017-12-22T20:02:19+5:302017-12-22T20:03:46+5:30

आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदिवास भोगला आहे त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याबाबत नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

Emergency prisoners will get status of freedom fighters | आणीबाणीतील कैद्यांना मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा

आणीबाणीतील कैद्यांना मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहितीनवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात निर्णय

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदिवास भोगला आहे त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याबाबत नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
सदस्य एकनाथ खडसे यांनी या विषयी माहितीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आणीबाणीच्या काळात अनेकांना १९ महिने तुरुंगात राहावे लागले होते. काही राज्यांमध्ये अशा बंदिवानांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देऊन पेन्शन देण्यात येते. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश राज्यांमधून या संदर्भात माहिती घेण्यात आली. त्यानुसार राज्यातील अशा बंदिवानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Emergency prisoners will get status of freedom fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.