नागपुरातील १२७० अतिक्रमणांचा सफाया : फुटपाथ मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:13 AM2021-01-19T00:13:17+5:302021-01-19T00:14:58+5:30

Elimination o fencroachments , Nagpur news महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने सोमवारी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागातील फुटपाथवरील तब्बल १२७० अतिक्रमणांचा सफाया केला.

Elimination of 1270 encroachments in Nagpur: Footpath cleared | नागपुरातील १२७० अतिक्रमणांचा सफाया : फुटपाथ मोकळे

नागपुरातील १२७० अतिक्रमणांचा सफाया : फुटपाथ मोकळे

Next
ठळक मुद्देमनपाची अतिक्रमण हटाव मोहीम 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने सोमवारी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागातील फुटपाथवरील तब्बल १२७० अतिक्रमणांचा सफाया केला. काही भागातील विरोधाला न जुमानता आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार सर्व झोनमध्ये ही मोहीम धडाक्यात राबविण्यात आली. मंगळवारीही मोहीम सुरू राहणार आहे.

लक्ष्मीनगर झोन : लक्ष्मीभवन चौक ते आठरस्ता चौक ते पोलीस प्रशिक्षण चौक ते साई मंदिर वर्धा रोड ते अजनी चौक, देवनगर ते छत्रपती चौक ते खामला चौक ते परत पोलीस प्रशिक्षण केंद्र या मार्गावरील १५८ अतिक्रमणे हटविण्यात आली. एक ट्रक साहित्य जप्त केले.

धरमपेठ झोन : युनिव्हर्सिटी लायब्ररी चौक ते सराफा बाजार चौक दरम्यानच्या फुटपावरील अतिक्रमण हटविले. त्यानतंर गोकुळपेठ बाजार परिसरातील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. तसेच गोकुळपेठ ते शंकरनगर मार्गावरील अतिक्रमण हटविले. अशाप्रकारे १७० अतिक्रमणे हटविण्यात आली.

हनुमाननगर झोन : तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक, मानेवाडा चौक ते म्हाळगीनगर चौक ते हुडकेश्वर मेन रोड ते शारदा चौक दरम्यानच्या रस्त्यालगतचे फुटपाथ मोकळे करण्यात आले. या झोनमधील १७० अतिक्रमणे हटविण्यात आली.

धंंतोली झोन : रामेश्वरी रोड ते सुभाषनगर ते वंजारीनगर ते तुकडोजी पुतळा येथील फुटपाथ परिसर पूर्णपणे खाली करण्यात आले. झोनच्या पथकांनी १६० अतिक्रमणे हटविली.

नेहरूनगर झोन : या झोनमधील बॉलिवूड सेन्टर पॉइंट ते म्हाळगीनगर चौक दरम्यानच्या फुटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. कारवाईत १४२ अतिक्रमणे हटविण्यात आली.

गांधीबाग झोन : मोमिनपुरा कब्रस्तान रोडच्या फुटपाथवरील १२ अतिक्रमणे हटविण्यात आली. टिनाचे शेड तसेच दुकानांचे बांधकाम तोडले. चार घरासमोरील छत तोडण्यात आले. मोमिनपुरा ते सोखता भवन, बडकस चौक ते महाल कोतवाली, गांधीबाग परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. या झोनमधील १४२ अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला.

लकडगंज झोन : एच.बी. टाऊन परिसरातील फुटपाथ मोकळे करण्यात आले. या परिसरातील ३४ अतिक्रमणे हटविण्यात आली.

आशीनगर झोन : इंदोरा चौक ते कमाल चौक, आवळेबाबू चौक परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. पथकाने १६५ अतिक्रमणे हटविली.

मंगळवारी झोन : पोलीस तलाव ते सीआयडी ऑफिस, आनंद नगर, पेन्शन नगर यासह अन्य भागातील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. या झोनमधील १४३ अतिक्रमणे हटविण्यात आली.

Web Title: Elimination of 1270 encroachments in Nagpur: Footpath cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.