शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

दिवाळीआधीच वीज संकट; राज्यातील नऊ युनिट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:13 AM

कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.

ठळक मुद्देनागपुरातील खापरखेड्यात एक, कोराडीतील दोन युनिट प्रभावित

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत.महाजेनकोच्या अहवालानुसार भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, चंद्रपूर वीज केंद्रातील ५, ३, ८ आणि ९, खापरखेड्यातील १, कोराडीतील ६ आणि ७ तर परळी येथील ७ क्रमांकाच्या युनिटमधील वीज उत्पादन कोळशाअभावी रोखण्यात आले आहे. त्याचप्रकारे भुसावळ येथील ४,५, चंद्रपूर येथील ४,६,७, कोराडीतील ८,९,१० आणि पारस येथील ४ क्रमांकाच्या युनिटचे उत्पादन प्रभावित झाले आहे. दुसरीकडे परळी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ४ व ५ ला वित्तीय कारणांमुळे बंद ठेवले आहे. चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, पारस आणि परळी येथील १-१ युनिट तांत्रिक त्रुटीमुळे बंद ठेवले आहे.दिवाळी तोंडावर असताना विजेचे हे संकट उभे ठाकले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रात १०,१७० मेगावॉट क्षमतेच्या ऐवजी केवळ ५१३२ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पॉवर एक्सचेंजमधून महागड्या दरावर ३४०५ मेगावॉट वीज खरेदी करावी लागत आहे. प्रदेशातील खासगी वीज आणि केंद्रीय ग्रीडच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. यानंतरही मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुंबई वगळता राज्यात २०,४७४ मेगावॉट इतकी विजेची मागणी होती. तर पुरवठा केवळ १३,७७२ इतका होत आहे. परिणामी राज्यातील ग्रामीण भागातील विशेषत: अधिक हानी असणारे जी १, जी २ आणि जी ३ क्षेत्रात लोडशेडिंग केली जात आहे.

१५ हजार मेट्रिक टन कोळशाची रस्त्याने वाहतूककोळशाच्या कमतरतेमुळे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सूत्रानुसार कोळशाच्या आयातमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे महाजेनकोचे वरिष्ठ अधिकारी वेकोलि आणि रेल्वेदरम्यान समन्वय मजबूत करून कोळसा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोळसा खदानीतून रस्ते मार्गाने रोज १५ हजार मेट्रिक टन कोळशाची वाहतूक महाजेनको करीत आहे.

किती पुरेल कोळसा?राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रातील कोळशाच्या साठ्याबाबत अतिसंवेदनशील स्थिती आहे. कोराडीमध्ये चार दिवस, नाशिक, परळी, पारस आणि चंद्रपूरमध्ये एक दिवसाचा कोळशाचा साठा आहे. खापरखेडा आणि भुसावळ हेसुद्धा प्रत्येकी अडीच दिवसाच्या साठ्यासह संवेदनशील स्थितीत आहेत. 

टॅग्स :electricityवीज