शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांकडे तब्बल ७ हजार कोटींहून अधिकची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 21:16 IST

वीज देयकांच्या थकबाकीची वाढती रक्कम ही महावितरणसाठी डोकेदुखी बनली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत नागपूर विभागातील ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम ही तब्बल ७ हजार कोटींहून अधिक होती.

ठळक मुद्देनागपूर विभागातील वास्तव : माहिती अधिकारातून खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज देयकांच्या थकबाकीची वाढती रक्कम ही महावितरणसाठी डोकेदुखी बनली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत नागपूर विभागातील ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम ही तब्बल ७ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. नागपूर विभागात किती विजेची मागणी होती, वर्षभरात किती विजेचा पुरवठा झाला, वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा किती व १० लाखांहून अधिक थकबाकी किती ग्राहकांकडे आहे, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. नागपूर मंडळात अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण मंडळाचा समावेश होतो. महावितरणकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१९-२० या आर्थिक वर्षात नागपूर विभागात ६ हजार ५२४ कोटी १५ लाख रुपयांच्या विजेची मागणी होती. ९३३ कोटी ५७ लाख ५७ हजार ६३६ युनिट विजेचा पुरवठा करण्यात आला. या कालावधीत ३१ लाख ४३ हजार ३५८ ग्राहकांकडे थकबाकी होती. थकबाकीची एकूण रक्कम ही ७,९३० कोटी ४० लाख ३० हजार ८६६ इतकी होती.दरम्यान, १० लाख किंवा त्याहून अधिक थकबाकी असलेले नागपूर विभागातील ग्राहकांची संख्या २८ इतकी होती. या ग्राहकांकडे जानेवारी महिन्यात व्याजासह ४ कोटी ९१ लाख ३६ हजार ४८० रुपयांची थकबाकी होती.वर्ष               थकबाकीदार ग्राहक               थकबाकी२०१५-१६     २१,५८,०५९                          ३८,४२,८५,७७,१७२२०१६-१७    २२,९२,५८९                           ४७,८४,८८,५६,११७२०१७-१८    २३,१९,७२१                            ५८,४६,७७,२६,३५७२०१८-१९    २६,५६,४१८                           ७१,१८,८४,४८,६५९२०१९-२०    ३१,४३,३५८                            ७९,३०,४०,३०,८६६

टॅग्स :mahavitaranमहावितरणconsumerग्राहक