राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 20:30 IST2018-05-03T20:30:04+5:302018-05-03T20:30:23+5:30

राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील १९२ गावांतील सुमारे ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे. महावितरणकडून विदर्भातील ११ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती.

Electricity connections to 8500 families in the state | राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

ठळक मुद्देग्राम स्वराज्य अभियान : विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील १९२ गावांतील सुमारे ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे. महावितरणकडून विदर्भातील ११ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती.
केंद्र्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या २३ जिल्ह्यांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे २०१८ रोजीच पूर्ण केले असून या १९२ गावातील ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे. विदर्भातील अकोला ४१०, अमरावती ७३५, भंडारा २४४, बुलढाणा ५६५, चंद्रपूर ७४४, गडचिरोली १०९२, गोंदिया ५९, नागपूर १०७, वर्धा ५, वाशीम ४२६ यवतमाळ ७८८ इतक्या वीज जोडण्या देण्यात आल्या.
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रमामुळे राज्यातील ८८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात दुर्गम व संवेदनशील अशा गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्र्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्ह्यातही वीजजोडणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

Web Title: Electricity connections to 8500 families in the state