विदर्भात १५०८ कृषी पंपांना वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:49+5:302021-02-05T04:59:49+5:30

नागपूर : महावितरणने कृषी पंप धोरणानुसार गुरुवारपर्यंत विदर्भात (नागपूर प्रादेशिक विभाग) १५०८ कृषी पंपांना विजेचे कनेक्शन दिले आहेत. सर्वाधिक ...

Electricity connection to 1508 agricultural pumps in Vidarbha | विदर्भात १५०८ कृषी पंपांना वीज कनेक्शन

विदर्भात १५०८ कृषी पंपांना वीज कनेक्शन

नागपूर : महावितरणने कृषी पंप धोरणानुसार गुरुवारपर्यंत विदर्भात (नागपूर प्रादेशिक विभाग) १५०८ कृषी पंपांना विजेचे कनेक्शन दिले आहेत. सर्वाधिक ५०७ कनेक्शन नागपूर प्रदेशात देण्यात आले. ऊर्जा विभागाच्या कृषी पंप वीजजोडणी धोरणानुसार प्रदेशात लघुदाब लाईनच्या वीज खांबावरून ६०० मीटर अंतरापर्यंत असलेल्या ७०८४ कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. महावितरणच्या अनुसाएँ विदर्भात अकोला येथे २२८, अमरावती ४५९, चंद्रपूर १६२, गोंदिया १५२ आणि नागपूर विभागात ५०७ कनेक्शन देण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे १ एप्रिल २०१८ पासून कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास गती देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने धोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार शिल्लक रकमेतही सूट देण्यात येत आहे. २६ जानेवारीला त्याचा प्रारंभ झाला. दोन दिवसांत प्रदेशात एकूण ७०८४ कृषी पंपांना विजेचे कनेक्शन देण्यात आले. सर्वाधिक ३७७१ कनेक्शन पुणे प्रादेशिक विभागात देण्यात आले. कोकण विभागात १४३३ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ३७२ कनेक्शन देण्यात आले.

...........

Web Title: Electricity connection to 1508 agricultural pumps in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.