शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपन्या दोन तास अतिदक्ष राहणार : महापारेषणने जारी केले दिशानिर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 21:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत.

ठळक मुद्देस्ट्रीट लाईट सुरू ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत. महापारेषणने यासंदर्भात दिशानिर्देश जारी करीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतची वेळ अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने यादरम्यान वीज उत्पादन व वितरण कंपन्यांना विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.महापारेषणने स्पष्ट केले आहे की, ग्रीड फेल होऊ नये म्हणून हायड्रो प्रोजेक्टमधून पूर्ण क्षमतेने उत्पादन करावे लागेल. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कंपनीने मनपासह सर्व स्थानिक संस्थांना पथदिवे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक दिनेश वाघमारे यांनी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आपापल्या घरातील लाईटशिवाय सर्व उपकरणेसुरू ठेवण्यास सांगितले आहे. रुग्णालयातील लाईट बंद न करण्याचेही आवाहन केले आहे. राज्यातील ग्रीडची फ्रिक्वेन्सी मेन्टेन ठेवणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीने तयारी केली आहे. दोन तास सर्व वीज कंपन्या अतिदक्षता बाळगतील.वीज बंद हाऊ देणार नाही : ऊर्जामंत्री राऊतऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा नागरिकांना लाईट बंद न करता दिवे जाळण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, अचानक विजेची मागणी कमी झाल्यास ग्रीड फेल होऊ शकतो. हवामान खराब झाल्याने ब्रेकडाऊन झाल्यास मागणीवर परिणाम पडतो. परंतु देशभरात पहिल्यांदाच एकाच वेळी सर्वजन वीज बंद केल्याने ग्रीडवर परिणाम पडू शकतो. राज्यातील वीज कंपन्यांचे अधिकारी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कामाला लागले आहेत. कुठल्याही परिस्थितीत ग्रीड फेल होऊ देणार नाही. वीज बंद होऊ देणार नाही.