३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ व्हावे : नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:25 AM2020-05-30T00:25:40+5:302020-05-30T00:27:43+5:30

लॉकडाऊनमुळे नागरिक गेल्या अडीच महिन्यांपासून घरीच बसले आहेत. रोजगार हिरावलेला आहे. अशा परिस्थितीत विजेचे बिल देणे कठीण झाले आहे, तेव्हा ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. तसेच मीटर रीडिंग व बिल वितरण होत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली.

Electricity bill up to 300 units should be waived: Citizens demand | ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ व्हावे : नागरिकांची मागणी

३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ व्हावे : नागरिकांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देमीटर रीडिंग, बिल वितरण होत नसल्याने नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक गेल्या अडीच महिन्यांपासून घरीच बसले आहेत. रोजगार हिरावलेला आहे. अशा परिस्थितीत विजेचे बिल देणे कठीण झाले आहे, तेव्हा ३०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. तसेच मीटर रीडिंग व बिल वितरण होत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली.
महावितरणने लॉकडाऊनमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ‘वेबिनार’चे आयोजन केले होते. यात मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी सहभाग घेतला आणि आपल्या अडचणींकडे लक्ष वेधले. प्रभारी प्रादेशिक संचालक सुहार रंगारी आणि प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकूण त्यांना कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली. लोकजागृती मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. रमण सेनाड, राजेंद्र गिल्लूरकर आणि प्रवीण घुले यांनी ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी केली. मानेवाडा येथील किशोर उपरे यांनी आॅनलाईन रीडिंग सबमिट सादर करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. यावेळी कंपनी अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, अविनाश सहारे, हरीश गजबे व डॉ. सुरेश वानखेडे, उपमहाव्यवस्थापक प्रमोद खुळे उपस्थित होते.

दोन महिन्यांपासून कनेक्शन मिळाले नाही
सुभाष आर्य यांनी सांगितले की, त्यांनी लॉकडाऊनपूर्वी वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. परंतु दोन महिन्यानंतरही कनेक्शनसाठी कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. यावर अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने कनेक्शन जारी करण्याचे निर्देश दिले. यावेळी औद्योगिक ग्राहकांनी विदर्भातील उद्योगांना मिळणारी सबसिडी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

ग्राहक पंचायत : ५० टक्के सवलत द्यावी
महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ तसेच इतर वीज कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून वीजमूल्याची दुप्पट दराने आकारणी करीत आहेत. सध्याच्या संकटकाळात अनेकांची कमाई कमी आणि बंद झाल्यामुळे एप्रिल २०२० पासून सहा महिन्यांपर्यंत ३०० युनिट पर्यंत ग्राहकांना सरसकट ५० टक्के सवलत द्यावी, असे आवाहन ग्राहक पंचायतने केले आहे. यासंदर्भात विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ संघटक डॉ. कल्पना उपाध्याय व विदर्भ सचिव लीलाधर लोहरे यांनी एका निवेदनाद्वारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे. 'कोरोना' सारख्या वैश्विक संकटकाळात अनेकांचे उद्योग, व्यापार जवळपास बंदच असून त्याचे विपरीत परिणाम वैयक्तिक अर्थकारणावर देखील दिसून येत आहेत. अनेकांना नोकºया गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अशा सर्व ग्राहक वर्गासाठी एप्रिल २०२० पासून सहा महिने एकूण मासिक बिलावर तीनशे युनिट पर्यंत ५० टक्के सवलत देण्यात यावी. त्याच प्रमाणे ग्राहकांना त्यांनी देय असलेले वीजबिल विहित मुदतीत भरता आले नाही या कारणासाठी लॉकडाऊनशी संबंधित परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत विलंब आकार, व्याज व दंड आकारण्यात येऊ नये.

३० वीज देयक भरणा केंद्र सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर शहरात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेल्या महावितरणच्या वीज भरणा केंद्रांपैकी काँग्रेस नगर विभागातील ३० वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. शहरातील उर्वरित भागात टप्याटप्यात वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात येतील.
वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यास अडचण होत असल्याची बाब महावितरणकडून नागपूर महानगरपालिकेस अवगत करून देण्यात आली होती. महानगरपालिकेने कन्टेन्मेंट झोन वगळता शहरात वीज देयक भरणा केंद्र सुरू करण्याची परवानगी महावितरणला दिली आहे. यानुसार २८ मेपासून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देशित केलेल्या मानकांचे पालन करून वीज देयक भरणा केंद्र सुरू करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. यानुसार येथे वीज ग्राहक आपल्या वीज देयकाची रक्कम भरू शकतील.
महावितरणकडून सध्या छापील देयकाची प्रत वितरित करणे बंद केले आहे. यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेला एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून देयकाची रक्कम भरावी. वीज देयक भरणा केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, असे नागपूर शहर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले आहे.

Web Title: Electricity bill up to 300 units should be waived: Citizens demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.