नागपूर जिल्ह्यात गळफास लावून इलेक्ट्रिशियनची रिसोर्टमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 21:26 IST2021-09-02T21:25:39+5:302021-09-02T21:26:03+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्टच्या टायगर हॉल येथे एका इलेक्ट्रिशियनने गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर जिल्ह्यात गळफास लावून इलेक्ट्रिशियनची रिसोर्टमध्ये आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्टच्या टायगर हॉल येथे एका इलेक्ट्रिशियनने गळफास लावून आत्महत्या केली. भूषण सुरेश धामगाये (२८), रा. न्यू ठवळे कॉलनी, जरीपटका, नागपूर असे मृताचे नाव आहे. (Electrician commits suicide by hanging in Nagpur district)
भूषण हा गत पाच वर्षांपासून बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्ट येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. गुरुवारी भूषण याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्टार की पॉईंट येथील टायगर हॉल येथील लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास लावला.
कोंढाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल भोजराज तांदूळकर व पोलीस नायक नीतेश डोकरीमारे घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहोस्तोवर भूषणच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.