वडीलच प्रत्यक्षात आहेत देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:12+5:302021-06-20T04:07:12+5:30

नागपूर : रविवारी फादर्स डे आहे. त्यामुळे वडील एका दिवसापुरते मर्यादित आहेत असे होत नाही. वडील आहेत म्हणून आम्ही ...

The elders are actually angels | वडीलच प्रत्यक्षात आहेत देवदूत

वडीलच प्रत्यक्षात आहेत देवदूत

नागपूर : रविवारी फादर्स डे आहे. त्यामुळे वडील एका दिवसापुरते मर्यादित आहेत असे होत नाही. वडील आहेत म्हणून आम्ही आहोत. आमचा आनंद, जीवनातील यश वडिलांमुळेच आहे. फादर्स डे निमित्त ‘लोकमत’ने शहरातील काही नागरिकांशी चर्चा केली असता हा सार समोर आला. सर्वांच्या मते, वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच ते जीवनात यशस्वी झाले आहेत. त्यांनी अनुभवलेले चांगले दिवस आणि आनंद वडिलांमुळेच आहे. जीवनावर वडिलांचा किती प्रभाव आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे. परंतु वडीलच आपल्यासाठी देवदूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

...........

नीरीचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक जे. एस. पांडे यांनी आपले वडील प्रोफेसर जगदिश पांडे यांच्याबाबत सांगितले की, बालपणी त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी त्यांच्यावर कधीच दबाव टाकला नाही. त्यांनी आपल्या वडिलांनाच लहानपणापासून शिक्षण घेताना आणि लेखन करताना बघितले आहे. अभ्यास कर म्हणून मला कधीच सांगण्याची वेळ आली नाही. सायंकाळी तर वडिलांनी कधीच अभ्यास करू दिला नाही. ते सायंकाळी खेळायला जा म्हणून मैदानात पाठवित होते. त्यांचे विचार मला आज पटत आहेत. जीवनात शिक्षणच नव्हे तर खेळणेही आवश्यक आहे. परंतु आज पालक मुलांवर अभ्यासासाठीच दबाव टाकताना दिसतात.

............

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे जनसंपर्क सल्लागार सत्येंद्र सिंह यांनी आपले वडील कामता प्रसाद सिंह यांच्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की आई आमच्यावर प्रेम करते. परंतु वडील आपले प्रेम कधी उघड करीत नाहीत, ते आम्हाला न दाखवताच आमच्यावर प्रेम करतात. मी काय करायला पाहिजे हे कधी वडिलांनी सांगितले नाही. त्यांच्या आचरणातून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. मुलांवर संस्कार कधीच जबरदस्तीने होत नाहीत. तर ते माझ्यासमोर नेहमी आदर्श ठेवत होते. शिक्षणासाठी मला प्रोत्साहित करीत होते. माझ्या लहान कामामुळेही त्यांना खूप आनंद होत होता.

...............

डीसीपी गजानन राजमाने यांनी आपले वडील शिवलिंग राजमाने यांच्याबाबत सांगितले की, नागरिक नेहमी सांगतात की तुम्हाला मोठ्या पदावर जायचे असेल तर त्या विभागात तुमचा गॉड फादर असणे आवश्यक आहे. परंतु माझ्या वडिलांनी मला इतके कार्यक्षम बनविले की मला त्याची कधी गरजच पडली नाही. शिक्षणापेक्षा वडिलांनी खेळणे, क्रीडा प्रकारांना प्राधान्य दिले. त्यांनी अभ्यास कसा सुरू आहे हे कधीच विचारले नाही. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळेच मी शिक्षण आणि खेळण्यात समन्वय ठेवून आज या पदापर्यंत पोहोचलो आहे.

...............

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे सल्लागार बी. के. शर्मा छांगानी आपले वडील शिवकरण शर्मा छांगानी यांच्याबाबत म्हणाले की, वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते नेहमी मला वैद्यकीय क्षेत्रात पाठविण्यास उत्सुक होते. परंतु मला संगीताची आवड होती. परंतु वडिलांच्या भीतीने मी संगीताला प्राधान्य दिले नाही. या पदावर आल्यानंतर वडिलांचा निर्णय चुकीचा नव्हता हे माझ्या लक्षात आले. त्यांना माझ्या क्षमतेवर विश्वास होता त्यामुळे ते माझ्यावर रागावत नव्हते असे त्यांनी सांगितले.

.....................

Web Title: The elders are actually angels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.