वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST2021-03-10T04:08:05+5:302021-03-10T04:08:05+5:30

नागपूर : हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण मलिक (वय अंदाजे ६५) ...

Elderly cleaner strangled to death | वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या

वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या

नागपूर : हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण मलिक (वय अंदाजे ६५) नामक वृद्धाची गळा चिरून आरोपीने हत्या केली. मंगळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर एका सदनिकेत हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीचे ऑफिस आहे. येथे लक्ष्मण मलिक सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तो मूळचा जरीपटका येथील रहिवासी असून, ऑफिस बंद झाल्यानंतर तो तेथेच राहायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यानंतर मलिक तेथे थांबला. आज सकाळी १०.१५ च्या सुमारास ऑफिस उघडायला कर्मचारी आले तेव्हा खुर्चीत बसलेल्या अवस्थेत मलिक रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्याचे हात मागे बांधून होते आणि गळ्यावर कैची किंवा पेचकससारख्या शस्त्राचे वार केल्याच्या खुणा होत्या. खाली रक्ताचे थारोळे साचले होते. कर्मचाऱ्यांनी ही माहिती गणेशपेठ पोलिसांना कळविली. गणेशपेठ पोलिसांचा ताफा, तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा शोध घेणे सुरू होते.

Web Title: Elderly cleaner strangled to death