वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 06:31 IST2025-12-11T06:30:53+5:302025-12-11T06:31:28+5:30
एसटी सेवा ही कुठल्याही प्रकारच्या फायद्यासाठी चालविली जात नाही. शासनाच्या विविध योजनांमुळे उलट महामंडळाला नुकसानच सहन करावे लागते.

वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
नागपूर : राज्यातील परिवहन व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी वर्षभरात ८ हजार नवीन एसटी बसेस घेण्यात येणार आहेत. तीन हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या वर्षात उर्वरित बसेसची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाई जगताप, बंटी पाटील यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांची प्रलंबित देयके अदा करण्याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. त्याच्या उत्तरादरम्यान सरनाईक यांनी ही माहिती दिली.
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
एसटी सेवा ही कुठल्याही प्रकारच्या फायद्यासाठी चालविली जात नाही. शासनाच्या विविध योजनांमुळे उलट महामंडळाला नुकसानच सहन करावे लागते. मात्र, जनतेचे हित जास्त महत्त्वाचे आहे. २०४७ पर्यंत डिझेलवरील सर्व बसेसची जागा इलेक्ट्रिक बसेस घेतील. तसेच दोन महिन्यांत राज्यातील २१६ एसटी डेपोच्या विकासाची प्रक्रिया सुरू होईल. पीपीपी मॉडेलअंतर्गत हा विकास होईल. २०२९ पर्यंत राज्यातील सर्व एसटी डेपोंचा कायापालट करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे व कामगारांना डबल शिफ्टदेखील करावी लागते. मात्र, तात्पुरत्या पद्धतीवर अडीच हजार चालक घेण्यात येतील व लवकरच कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. पुरवणी मागण्यांमध्येदेखील महामंडळाला २ हजार ८९३ कोटी रुपये मिळणार आहे.