शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

नागपुरातील  राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 8:28 PM

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती.

ठळक मुद्देसाप पकडण्यासाठी सर्च मोहीम : वन विभाग आणि पीडब्ल्यूडी विभागाची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती.पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रशासनातर्फे प्रत्येक दृष्टीने तयारी केली जात आहे. यातच पावसाच्या दिवसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता, राजभवन, विधानभवन, आमदार निवास, नागभवन, १६० खोल्यांचे गाळे आदी परिसरात साप असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आतापासूनच सर्प मित्राच्या साहाय्याने साप पकडण्यासाठी सर्च मोहीम राबविली जात आहे. आरएफओ निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर गिरी यांच्या नेतृत्वात सर्पमित्र डंभारे हे या मोहिमेत सहभागी आहेत. सोमवारी याची सुरुवात रविभवन येथून करण्यात आली. दरम्यान रविभवन येथे साप शोधत असतानाच राजभवन येथे धामण दिसून आल्याचे गिरी यांना फोनवर कळले. तिघेही तातडीने राजभवनकडे निघाले. राज्यपालांच्या बंगल्याच्या परिसरातच ही धामण होती. ती डंभारे यांनी पकडली. ही धामण साडे आठ फूट लांब आहे. वन विभागातर्फे या कारवाईचा पंचनामा करण्यात आला. निंबाळकर यांच्यानुसार धामण विषारी नाही. ती अतिशय चपळ असते. पंचनामा झाला असून तिला हिंगणा वनपरिक्षेत्रातील मोहगाव झिल्पी येथे सोडण्यात येईल.सर्पमित्राद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणअधिवेशनकाळात काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सापाविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्पमित्र डंभारे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यात साप दिसला तर न घाबरला काय केले पाहिजे. त्याला व स्वत:ला इजा होणार नाही, याची कशी खबरदारी घ्यावी, याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरforest departmentवनविभाग