शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

शिक्षण घोटाळा : ३६ संस्थाचालकांची झोप उडाली, सचिव, मुख्याध्यापकही रडारवर !

By योगेश पांडे | Updated: June 11, 2025 12:31 IST

शिक्षणक्षेत्रात बोगसपणाचा कहर : पूर्व विदर्भातील शाळांचा दर्जाच नासविला

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावी-बारावीच्या निकालांत नागपूरचा क्रमांक मागील काही वर्षांपासून खालीच असल्याचे दिसून आले आहे. मुळात याला शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षणसंस्थाचालक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे. अधिकारी व संस्थाचालकांच्या हातमिळवणीतून पावणेसातशेहून अधिक नियमबाह्य शालार्थ आयडी जारी करण्यात आले. ज्यांना शिकवतादेखील येत नाही, अशा शिक्षकांची संस्थाचालकांनी शाळांमध्ये नियुक्ती करवून शासनाचे वेतन चालू करवून घेतले. अशा पद्धतीचे ३६ शिक्षण संस्थाचालक आता पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी भंडारा येथील शिक्षण संस्थाचालक चरण चेटुले याला ताब्यात घेतले व त्यानंतर केवळ मुख्याध्यापकच नव्हे, तर शिक्षण संस्थाचालकदेखील यात सहभागी असल्याचे समोर आले. पोलिसांनी या गुन्ह्यासोबतच अपात्र शालार्थ आयडीच्या गुन्ह्यातदेखील सखोल तपास केला आहे. तीन उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह दोन्ही गुन्ह्यांत १८ जणांना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. यातूनच पोलिसांना ३६ शिक्षण संस्थाचालकांची नावे मिळाली आहेत. या सर्व शिक्षण संस्थाचालकांनी मागील अनेक वर्षांपासून 'अर्थपूर्ण' व्यवहार करत पात्रता किंवा क्षमता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली. त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार करून त्यांचे वेतन सुरू करवून दिले. हे सर्व संस्थाचालक आता एसआयटीच्या रडारवर आहेत. त्यांच्यासह शिक्षणसंस्थांचे सचिव, मुख्याध्यापक यांच्यावरदेखील लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अब तक ६८१सुरुवातीला सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५८० जणांचे शालार्थ आयडी नियमबाह्य पद्धतीने काढल्याचे समोर आले होते. मात्र एसआयटीने केलेल्या तपासात हा आकडा आता वाढला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी किंवा छाननी समितीसमोर कुठलाही प्रस्ताव न देता ६८१ जणांचे शालार्थ आयडी प्राप्त करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या रॅकेटमध्ये सरकारी पातळीपासून शिक्षणसंस्था चालकांपर्यंतची मोठी 'चेन' आहे. 

नवीन शैक्षणिक सत्रात नवे हादरेएसआयटीकडून विविध मार्गानी तपास सुरू आहे. त्यामुळे नियमबाह्य शालार्थ आयडीप्रमाणेच अपात्र शिक्षक, रॅकेटमध्ये सहभागी असलेले संस्था सचिव, मुख्याध्यापक यांची यादीदेखील वाढण्याची शक्यता आहे. ६८१ शिक्षकांना लवकरच प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यातून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे, हे नव्याने समोर येणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पूर्व विदर्भातील शालेय क्षेत्राला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूर