शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 01:34 IST

नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देखरेदी-विक्री नियमित सुरू करा : विविध व्यापारी संघटनांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. बाजारपेठा बंद असल्याने अर्थव्यवस्था ढासळली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण ती पुन्हा बंद झाल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच व्यापार रुळावर येईल आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.महाल-केळीबाग रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, महाल, केळीबाग आणि बडकस चौक भागात ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. पण लॉकडाऊननंतर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. बाजारपेठा उघडल्यानंतरही खरेदीसाठी लोकांची मानसिकता तयार होणार नाही. त्याला वेळ लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. आता मार्केट नियम आणि अटींसह उघडण्यास परवानगी द्यावी. रेडिमेड स्टोअर्सचे विश्वास जैन म्हणाले, सीताबर्डी आणि धरमपेठ भागात दुकाने उघडण्याची मनपाने परवानगी द्यावी. मार्केट सुरू झाल्यास ग्राहकही सावधता बाळगून खरेदीसाठी घराबाहेर पडतील. सध्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आवश्यक वस्तू मिळत नसल्याने ग्राहकही त्रस्त आहेत.सक्करदरा दुकानदार असोसिएशनचे पदाधिकारी शीतल खानोरकर म्हणाले, सक्करदरासह विविध भागातील दुकाने सुरू करण्यास मनपाने मान्यता द्यावी. नियमांचे पालन करून दुकानांचे संचालन करण्यास व्यापारी तयार आहेत. जवळपास दोन महिन्यापासून ठप्प असलेल्या व्यापाराला संजीवनी देण्याचे काम मनपाने केल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आतातरी दुकाने सुरू करण्यास मनपाने संधी द्यावी. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यापारी रोशन चावला म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या कॉस्मेटिक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. या वस्तू कालाबाह्य होण्याचा कालावधी कमी असल्याने बंद दुकानात ठेवता येत नाही. दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. बºयाच वस्तू खराब झाल्या आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आता दुकाने सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे.