भविष्यात युद्धाचे अर्थशास्त्र महत्त्वाचे
By Admin | Updated: June 1, 2014 01:01 IST2014-06-01T01:01:06+5:302014-06-01T01:01:06+5:30
भविष्यात कुठल्याही युद्धात अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे प्रतिपादन मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल पी. कनकराज यांनी केले.

भविष्यात युद्धाचे अर्थशास्त्र महत्त्वाचे
परिसंवाद : एअर मार्शल पी. कनकराज यांचे प्रतिपादन
नागपूर : भविष्यात कुठल्याही युद्धात अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे प्रतिपादन मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल पी. कनकराज यांनी केले.
मेंटेनन्स कमांड वायुसेना आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजच्या (कॅप्स) संयुक्त विद्यमाने मुख्यालय मेंटेनन्स कमांड वायुसेनानगर येथे ‘टेक्नॉलॉजिकल ट्रेंडस् इन एरोस्पेस पॉवर’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनुरक्षण कमानचे ज्येष्ठ अनुरक्षण स्टाफ ऑफिसर एअर मार्शल सुखचैनसिंग, एअर व्हाईस मार्शल पी.एस. भारती, एअर व्हाईस मार्शल जे.व्ही. सिंग, संजय शर्मा, कॅप्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल विनोद पाटणी, एम. बहादूर, ग्रुप कॅप्टन बी. बोस आणि डॉ. मनप्रीत सेठी प्रामुख्याने उपस्थित होते.
पी.कनकराज यांनी वायुसेनेला अधिक मजबूत व सक्षम करण्याच्या दृष्टीने मेंटेनन्स कमांडने विकसित केलेल्या विविध उत्पादनांची तसेच सेवांची माहिती दिली. खासगी उद्योगाच्या मदतीने कमांडचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, मेंटेनन्स कमांड अधिक मजबूत झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसर्या चर्चासत्रात ‘पाकिस्तान व चीनमध्ये अण्वस्त्र व मिसाईल विकासामुळे भारतात सुरक्षेचे वातावरण व तंत्रज्ञानयुक्त आव्हान’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी एअर मार्शल सुखचैनसिंग म्हणाले, संशोधन आणि विशेषज्ञामुळे आज एरोस्पेसमध्ये नवनवे तंत्रज्ञान अवगत झाले आहेत.
सध्याचे दिवस चांगले आहेत. त्यामुळे स्वस्त बसून चालणार नाही. तर प्रत्येकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कार्यात आपणसुद्धा एरोस्पेसमध्ये अधिक काय योगदान देऊ शकतो याचा विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)