नवीन उड्डाणावर कोरोनाचे ग्रहण : प्रवासी संख्येचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 00:19 IST2021-03-31T00:18:03+5:302021-03-31T00:19:51+5:30
No new flight कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यावर्षी सुरू होणाऱ्या नवीन विमान सेवांवर ग्रहण लागले आहे.

नवीन उड्डाणावर कोरोनाचे ग्रहण : प्रवासी संख्येचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यावर्षी सुरू होणाऱ्या नवीन विमान सेवांवर ग्रहण लागले आहे. एका विमान कंपनीने घोषणेनंतर पुढे कोणतीही कारवाई केली नाही. तसेच अन्य दोन कंपन्याही संचालनासाठी पुढील कोणतीही संभाव्य तारखा स्पष्ट करण्याच्या स्थितीत नाहीत.
सन २०२० च्या अखेरीस तयार झालेल्या फ्लायबिग एअरलाईन्सने २०२१ मध्ये फेब्रुवारीत नागपूर ते हैदराबाद आणि इंदूरकरिता एटीआर-७४ विमानाने उड्डाण करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु महामारीच्या परिणामामुळे या दिशेने कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही. रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत स्टार एअर १६ मार्चपासून बेळगावकरिता (कर्नाटक) सुरू होणार होती. त्यानंतर संचालनासाठी १५ एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली. ही उड्डाणे आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि रविवारला उपलब्ध राहणार आहेत. या उड्डाणाचे संचालक ५० सीटांचे ईआरजे-१४५ एम्बरेर विमानाने करण्यात येणार आहे.
नागपुरातून सर्वाधिक उड्डाणाचे संचालन करणारी इंडिगो एअरलाईन्स विशाखापट्टणमकरिता २८ मार्चपासून थेट उड्डाणाचे संचालन करणार होती. पण त्याचे काय झाले, हे कळले नाही. यादरम्यान नागपूरसह देशाच्या सर्व विमानतळावरून विदेशाकरिता शेड्युल विमानावर पुन्हा ३० एप्रिलपर्यंत प्रतिबंध लावण्यात आले आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये विमान प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने प्रवासी संख्येत निरंतर घसरण होत आहे. या कारणाने विमान कंपन्या सध्या नवीन सेवा सुरू करण्याची जोखीम उचलण्यास तयार नाही.