इबोला पसरला वटवाघुळातून!
By Admin | Updated: August 6, 2014 01:17 IST2014-08-06T01:17:02+5:302014-08-06T01:17:02+5:30
पश्चिम आफ्रिकेतील लिओन, गिनी आणि लायबेरियासोबतच नायजेरियातही इबोला या जीवघेण्या रोगाची साथ पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (हू) ‘इबोला’ रोगास रोखणे कठीण

इबोला पसरला वटवाघुळातून!
पश्चिम आफिक्रेमध्ये ७०० बळी : अख्खे जग चिंताक्रांत
सुमेध वाघमारे - नागपूर
पश्चिम आफ्रिकेतील लिओन, गिनी आणि लायबेरियासोबतच नायजेरियातही इबोला या जीवघेण्या रोगाची साथ पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (हू) ‘इबोला’ रोगास रोखणे कठीण असल्याचे कबूल केले आहे. मृतांची संख्या ७०० वर पोहोचली आहे. इबोल्याची साथ आटोक्यात येत नसल्यामुळे अख्खे जग चिंताक्र ांत झाले आहे. याला कारण या भागातील फळे खाणारे वटवाघुळ आहे. तज्ज्ञाच्या मते, त्याच्या शरीरात या रोगाचा विषाणू असतोच. तेथून हा वन्य व पाळीव प्राण्यांमध्ये आणि आता मानवामध्ये याचा प्रादुर्भाव होत आहे.
इराक, सिरिया, लिबियानंतर दक्षिण आफ्रिकेत महाभयंकर साथरोगाचे सावट निर्माण झाले आहे. इबोला विषाणूंच्या धुमाकुळाला आळा घालण्यासाठी त्या भागातील सार्वजनिक आरोग्य विभागाने आणीबाणी जाहीर केली आहे. या विषाणूंची बाधा झालेल्या भागांना इतर भागांपासून वेगळे ठेवण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
मेडिकलच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे (पीएसएम) सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत बागडे यांनी सागितले, पूर्वी या रोगाचे रुग्ण दिसायचे. परंतु प्रमाण फार कमी होते. आता पश्चिम आफ्रिकेत मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत असून बळीची संख्या वाढल्याने जगात चिंतेचे वातावरण आहे. वटवाघुळामधून या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे. या रोगाची वैशिष्ट्ये म्हणजे हा श्वसनापासून पसरत नाही.
इबोलाच्या संक्रमित रुग्णाच्या रक्त, मल, मूत्र, घाम आणि लाळेपासून पसरतो. या रोगाची लक्षणे दोन ते २१ दिवसानंतरही दिसू शकतात. रुग्णामध्ये पाणी आणि क्षाराचे प्रमाण झपाट्याने कमी होते सोबतच आंतर आणि बाह्य रक्तस्राव होतो. यामुळे यात ९० टक्के मृत्यूची शक्यता असते.
भारतात इबोलाचे अद्याप रुग्ण आढळून आले नाहीत. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.