शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

‘पंचगव्य’ सेवन करा, ‘कोरोना’ला लांब ठेवा; गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:31 AM

गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयास संशोधनासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात सार्स, स्वाईन फ्लू, चिकन गुन्यासारख्या विषाणूंचा इतिहास सगळ्यांनीच बघितला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यावर प्रतिकारक औषधांवर संशोधन केले जाते. मात्र, आयुर्वेदात अशा विषाणूंचा प्रभाव टाळण्यासाठी मानवाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे गुण सांगितले आहेत. गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे. बडकस चौक येथील केंद्राच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी पत्रपरिषदेत हा दावा केंद्राचे समन्वयक सुनील मानसिंहका व नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्यासह डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. संजय काते, वैद्य नंदिनी भोजराज व सनत गुप्ता यांनी केला.डॉ. तपन चक्रवर्ती यांनी कोरानाची लक्षणे आणि त्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीवर प्रकाश टाकला. कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. त्यातुलनेत भारतात याचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्याचे कारण आपल्याकडील रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. कोरोना विषाणू चार मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचा असल्याने, तो स्वत: लांब जाऊ शकत नाही किंवा उडूही शकत नाही. हा विषाणू संसर्गामुळेच होतो, हे सिद्ध झाले आहे. संसर्ग होऊ नये म्हणून गोमूत्र अर्क आणि गोमूत्र आसव हे दोन उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आज देशभरात दहा लाखावर लोक अर्क व आसवाचे सेवन करीत आहेत. यापूर्वी स्वाईन फ्लूच्या वेळी आम्ही याचा प्रयोग केला तेव्हा ७५ टक्के सेवन करणाऱ्या लोकांना स्वाईन फ्लूची बाधा झाली नव्हती आणि ज्यांना झाली त्यांना अगदी सौम्य बाधा झाल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोमूत्र अर्क, गोमूत्र आसव यासह नस्य व धुपम ही प्रक्रिया उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. यावरील संशोधनाचे प्रस्ताव केंद्रातर्फे पाठविण्यात येत असून, देशभरातून आयुर्वेदिक तज्ज्ञांचेही याला समर्थन असल्याचे सुनील मानसिंहका यांनी सांगितले. अ‍ॅलोपॅथी औषधांनी रोग होऊच नये, याची काळजी कधीच घेतली नाही. मात्र आपल्याकडील आयुर्वेदाने प्राचीन काळापासून कुठल्याही विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आधीच स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस