शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास, जनसंवादाचीच आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 06:30 IST

उमेदवारांचा सकाळपासूनच सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत संपलेलाच नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व रविवार असा याेग साधताना पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. उमेदवारांचा सकाळपासूनच सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत संपलेलाच नव्हता. दिवसभरात मिळेल तेथे दाेन घास पाेटात ढकलून जनसंवादाला वेळ कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली गेली. साेबतच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांना भेट देत बुद्धविहारांमध्ये वंदना करण्यासही उमेदवार विसरले नाहीत.

नागपुरात भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांचा भर जनसंवाद यात्रांवर आहे. दीक्षाभूमी व संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त माल्यार्पण करून त्यांनी दिवस सुरू केला. गडकरी हे भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन लोकसंवाद यात्रेत सहभागी झाले. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले.  

प्रमुख नेत्यांचा विदर्भात तळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नाना पटाेले, कन्हैय्या कुमार, बाळासाहेब थाेरात, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडाेरे अशा दिग्गज नेत्यांमुळे पूर्व विदर्भात आजचा दिवस प्रचाराचा सुपर संडे झाला. 

सभा, गाठीभेटी अन् बैठका गडचिराेलीत भाजपचे खासदार अशोक नेते यांनी धानोरा, आमगाव येथे सभा घेतल्या. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे विजय वडेट्टीवार यांच्यासह भामरागड, घोट, देसाईगंज तालुक्यांतील कोरेगाव येथे सभेत व्यग्र हाेते. चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल येथे व्यापारी व विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. भंडारामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा असल्याने भाजपचे उमेदवार डाॅ. सुनील मेंढे यांच्यासह पदाधिकारी सकाळपासूनच गुंतले हाेते. काँग्रेसचे उमेदवार डाॅ. प्रशांत पडाेळे यांनी दिवसभर मतदारांच्या भेटीवरच भर दिला. 

टॅग्स :nagpurनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४