नागपुरातील बेलतरोडीत भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:15 IST2020-03-15T00:12:36+5:302020-03-15T00:15:26+5:30
कोरोनाची दहशत असताना बेलतारोडी परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याचे सांगण्यात येते.

नागपुरातील बेलतरोडीत भूकंपाचे धक्के
ठळक मुद्देतीव्रता १.२ ते १.५ रिस्टर स्केल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दहशत असताना बेलतारोडी परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याचे सांगण्यात येते. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता १.२ ते १.५ रिस्टर स्केल होती. असे हवामान खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास बेलतरोडी भागातील नागरिकांना जमीन व इमारत हालल्याचा भास अनेकांना झाल्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र पसरली.
दोन तासात तीन वेळा भूकंपांचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील इतरही काही भागात असे धक्के बसल्याचे मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.