संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:10 AM2020-04-08T11:10:35+5:302020-04-08T11:11:32+5:30

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलचे संचालन थांबविले असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे विफल ठरले आहेत.

E-commerce companies disappear in times of crisis | संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्या गायब

संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्या गायब

Next
ठळक मुद्दे किरकोळ व्यापाऱ्यांना हवे आर्थिक पॅकेज


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलचे संचालन थांबविले असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे विफल ठरले आहेत.
संकटकाळात ई-कॉमर्स पोर्टलची अशी वागणूक निंदनीय आहे. अशा काळात वाणिज्य वर्गांनी आपली जबाबदारी पार पाडून देशाच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. पण संकटात ई-कॉमर्स कंपन्या चक्क गायब झाल्याचा आरोप कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी लोकमतशी बोलताना केला. लोकांना मदतीची गरज असताना ई-कॉमर्स कंपन्यांनी पोर्टल बंद करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. अशा संकटकाळात व्यवसाय करणे या कंपन्यांना फायद्याचे वाटत नाही. पण अपार संशाधन असलेले ई-वाणिज्य पोर्टल किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय संपुष्टात आणण्यासाठी वर्षभर प्रयत्नरत करतात. पण आता ते पूर्णपणे अज्ञातवासात गेले आहे. देशावर आलेल्या संकटकाळात त्यांच्या पोर्टलची नितांत गरज आहे. संकटकाळात मित्र आणि शत्रूची खरी ओळख लोकांना झाली आहे.

देशात आवश्यक वस्तूंच्या वितरणात व्यापाऱ्यांच्या भूमिकेची भरतीया यांनी प्रशंसा केली. सर्व अडचणींवर मात करीत आणि कोरोनामुळे संक्रमित होण्याची शक्यता असतानाही व्यापारी स्वत:ला संकटात टाकून देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्यरित्या करीत आहेत. देशात आवश्यक वस्तूंचा व्यापार करणाºया जवळपास १.२५ कोटी व्यावसायिकांमध्ये लॉकडाऊनचे प्रतिबंध आणि अन्य अडचणीनंतरही २५ टक्के व्यापारी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. कोरोनामुळे देशातील व्यवसाय सध्या अनिश्चित आहे. गेल्या २० दिवसांमध्ये देशातील किरकोळ व्यवसायात दरदिवशी जवळपास १५ हजार कोटींच्या व्यवसायाची हानी होत आहे. भारतात जवळपास सात कोटी व्यापाऱ्यांपैकी जवळपास ६.५ कोटी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनमुळे आपला व्यापार बंद केला आहे. अशा व्यापाऱ्यांसाठी एक विशेष आर्थिक पॅकेजची मागणी पंतप्रधानांकडे पत्र लिहून केली आहे. व्यापाऱ्यांना पॅकेज मिळाल्यास कोरोना महामारीचा ते दृढतेने सामना करतील, असे भरतीया म्हणाले.

 

Web Title: E-commerce companies disappear in times of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.