शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार; प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय 

By नरेश डोंगरे | Updated: February 17, 2023 19:55 IST

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार आहेत. 

नागपूर: नागपूर - मुंबई आणि मुंबई - नागपूर दुरंतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून थर्ड एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ती पूर्ण करण्यात येणार आहे. १५ जूनपासून नवीन बदलांचा हा निर्णय अंमलात येणार आहे. या नवीन बदलामुळे नागपूरहून मुंबईला येणाऱ्या - जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

नव्या बदलानुसार, या रेल्वेगाडीत आधी एक फर्स्ट एसी, तीन सेकंड एसी होत्या. दोन जनरेटर व्हॅन होत्या. त्या तशाच राहणार आहेत. मात्र, आधी थर्ड एसी ९ होत्या. त्या आता १५ करण्यात येणार आहेत. आधी स्लिपर कोच आठ होते, ते कमी करून आता दोन करण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक १२२९० नागपूर - सीएसएमटी मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये हा बदल १५ जूनपासून लागू होणार असून, गाडी क्रमांक १२२८९ सीएसएमटी मुंबई - नागपूर एक्स्प्रेसमध्ये हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. १७ फेब्रुवारीपासून सर्व बुकिंग केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग (रिझर्वेशन) करता येणार आहे.

उन्हाळ्याच्या अखेरीस काय फायदा ?एसीची खरी गरज उन्हाळ्यात असते. रेल्वे प्रशासनाने थर्ड एसी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणी १५ जूनपासून होणार आहे. तोपर्यंत उन्हाळा जवळपास संपल्यात जमा असतो. पावसाचे आगमन होत असल्याने उन्हाची तीव्रताही कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस एसी वाढवण्याऐवजी मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केल्यास प्रवाशांना चांगला दिलासा मिळू शकतो.

 

टॅग्स :nagpurनागपूरMumbaiमुंबईrailwayरेल्वेAC localएसी लोकल