जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धास निर्वस्त्र फिरवले

By Admin | Updated: September 26, 2015 02:53 IST2015-09-26T02:53:22+5:302015-09-26T02:53:22+5:30

जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीस मारहाण करून त्याला वस्तीमध्ये निर्वस्त्र फिरविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Due to the witchcraft suspicion of old age, | जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धास निर्वस्त्र फिरवले

जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धास निर्वस्त्र फिरवले

जरीपटका येथील घटना : दहा आरोपी अटकेत
नागपूर : जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीस मारहाण करून त्याला वस्तीमध्ये निर्वस्त्र फिरविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका येथे गुरुवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी १० आरोपींना अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, गुरुवारी ६० वर्षीय महिलेने याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, ७८ वर्षाच्या तिच्या पतीला वस्तीतील काही लोकांनी जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केली आणि वस्तीमध्ये निर्वस्त्र फिरवले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश खानपुरे, नीलेश रामटेके, मंगेश अंडे, नरेंद्र खंडारे, मनोज गुळवासे, गोलू बोरकर, प्रदीप मेश्राम, महेंद्र खंडारे, जितेंद्र खंडारे, विजय वंजारी, प्रतिमा वंजारी, काजल वंजारी व इतर आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, वस्तीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीच्या अंगात भूत आल्याने ती तिला पाहण्यासाठी गेली.
यावर माझ्या पतीने मुलीवर जादूटोणा केल्याचा आरोप करीत आरोपींनी त्यांच्या घरावर हल्ला केला. मारहाण केली आणि निर्वस्त्र फिरवले. जरीपटका पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the witchcraft suspicion of old age,