शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शिक्षण विभागाचा ‘खेळखंडोबा’!

By गणेश हुड | Updated: May 23, 2024 18:26 IST

Nagpur : उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नव्या शैक्षणिक धोरणानानुसार विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यात शाळांची संख्या दरवर्षी वाढत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. दुसरीकडे  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मागील काही वर्षापासून उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात चार उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच कार्यरत आहे. तीन पदे रिक्त असल्याने प्रभारी पदभार सांभाळत आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर असताना एकच कार्यरत असून १२ पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५४ पैकी ३६ पदे रिक्त असल्याने प्रभारिंच्या खाद्यावर भार वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर जि.प. शाळांचा दर्जा उंचावण्यासोबतच तळागाळातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्याची जबाबदारी आहे.  यासाठी शिक्षण विभागाने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे. मात्र रिक्त पदामुळे  उपक्रम राबविताना अडचणी येत आहे. रिक्त पदामुळे जिल्ह्यात पेन्शनशी संबंधित शेकडो प्रकरणे रखडली आहेत. संबंधित शिक्षकाच्या निवृत्तीपूर्वीच त्याची प्रक्रिया सुरू होते, परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे काम विलंबाने मार्गी लागत असल्याचे चित्र आहे.

अशी आहेत रिक्त पदेजिल्ह्यात माध्यमिक व प्राथमिकसाठी उपशिक्षणाधिका-यांचे प्रत्येकी दोन असे चार पदे मंजूर आहेत. परंतु त्यापैकी प्राथमिकमध्ये एकच नियमित उपशिक्षणाधिकारी कार्यरत असून, उर्वरित तीन पदे रिक्त आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर असून, एकच कार्यरत आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५४ पैकी सुमारे ३६ पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची १३६ पैकी २५ पदे रिक्त आाहेत. शिक्षण विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूर