लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण करू नये, अशा स्वरूपाचे मजकूर लिहिलेले फलक लावलेले असतात. परंतु पेट्रोल भरण्यासाठी येणारे वाहनधारक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गाडीत पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण केल्याने दुर्घटना घडतात. असाच प्रकार मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास टेलिफोन एक्सचेंज चौकातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर घडला. वाहनचालक मोबाईलवर संभाषण करीत असल्याने मोबाईलच्या रेडिएशनमुळे आगीचा भडका उडाला. यात दोन दुचाकी वाहने व वेंडिंग मशीन जळून खाक झाली.पेट्रोल पंपावरील पेट्रोलची दररोज तपासणी केली जाते. कर्मचारी जर्मनच्या कॅनमध्ये पेट्रोल तपासणीसाठी काढत असताना एक वाहन चालक मोबाईलवर संभाषण करीत होता. मोबाईलच्या रेडिएशनमुळे पेट्रोलचा भडका उडाला. यात हरीश बोकडे यांची एमएच ४-जी -एजी ७७५६ क्रमांकाची होंडा व घनश्याम चांदेकर यांची एमएच ३१-९७६५ क्रमांकाची प्लेझर अशा दोन गाड्या आगीत जळून खाक झाल्या. तसेच वेंडिंग मशीन जळाली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार फायरटेंडर घडनास्थळी पोहचले. जवानांनी थोड्याच वेळात ही आग आटोक्यात आणली. आग नेमकी मोबाईलवरील संभाषणामुळे लागली की अन्य कारणामुळे, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मोबाईलवर बोलताना नागपुरात पेट्रोल पंपावर लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 20:38 IST
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण करू नये, अशा स्वरूपाचे मजकूर लिहिलेले फलक लावलेले असतात. परंतु पेट्रोल भरण्यासाठी येणारे वाहनधारक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे गाडीत पेट्रोल भरताना मोबाईलवर संभाषण केल्याने दुर्घटना घडतात. असाच प्रकार मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास टेलिफोन एक्सचेंज चौकातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर घडला. वाहनचालक मोबाईलवर संभाषण करीत असल्याने मोबाईलच्या रेडिएशनमुळे आगीचा भडका उडाला. यात दोन दुचाकी वाहने व वेंडिंग मशीन जळून खाक झाली.
मोबाईलवर बोलताना नागपुरात पेट्रोल पंपावर लागली आग
ठळक मुद्देदोन दुचाकी जळून खाक : मोठी दुर्घटना टळली