भीतीमुळे मांत्रिकाची सहकारी महिला भूमिगत

By Admin | Updated: July 16, 2014 01:12 IST2014-07-16T01:12:49+5:302014-07-16T01:12:49+5:30

तालुक्यातील अमितनगर येथे अंधश्रद्धेतून शंकर पिंपळकर या मांत्रिकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे.

Due to fear the mantralaya co-operative women underground | भीतीमुळे मांत्रिकाची सहकारी महिला भूमिगत

भीतीमुळे मांत्रिकाची सहकारी महिला भूमिगत

कुटुंब भयभीत : गावाला आले पोलीस छावणीचे स्वरूप
बल्लारपूर: तालुक्यातील अमितनगर येथे अंधश्रद्धेतून शंकर पिंपळकर या मांत्रिकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, गावकऱ्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने जादूटोणा करण्यासाठी शंकरला सहकार्य करीत असल्याचा आरोप असलेली महिलादेखील दोन दिवसांपासून गावातून बेपत्ता झाली आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने या गावाला भेट दिली असता, गावात तणावपूर्ण शांतता होती.खबरदारीचा उपाय म्हणून गावात दोन दंगा नियंत्रण पथकांसह मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.
अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांना शंकरच्या मृत्यूचे समाधान आहे. त्याला याकामी मदत करणाऱ्या महिलेलाही ठार मारण्याच्या धमक्या गावकऱ्यांकडून मिळत असल्याने भयभीत झालेली ती महिला गावातून निघून गेली आहे. ती नेमकी कुठे गेली, हे कुणालाच माहीत नसले तरी पोलिसांनीच तिला सुरक्षितस्थळी ठेवले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मृतक शंकर पिंपळकरचे अन्य दोन भाऊ अमितनगरमध्येच राहतात. रविवारी शंकरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याचा एक भाऊ अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हता. त्यानेही गावकऱ्यांचीच बाजू घेतल्याची बाब समोर आली आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने मृत शंकरच्या घराला भेट दिली असता, घराच्या दाराला कुलुप दिसले. चौकशी केली असता, शंकरची पत्नी कुठे गेली हे माहित नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
शंकर पिंपळकरच्या बंदोबस्तासाठी ३०० रुपये वर्गणी
अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या अमितनगरवासियांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंध्र प्रदेशातील मांत्रिकाच्या एका टोळीला गावात पाचारण केले होते. शंकर पिंपळकर व त्याची एक महिला साथीदार जादुटोणा करीत असल्याचा दावा या टोळीने केला होता. त्यातून बाहेर काढण्यासाठी मोठा खर्च असल्याचे या टोळीने गावकऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार, गावकऱ्यांनी प्रत्येक कुटुुंबाकडून ३०० रुपये लोकवर्गणी गोळा केली होती. त्यातील काही रक्कम मांत्रिकाच्या टोळीला देण्यात आली. मात्र त्या टोळीचे नाव सांगण्यास कुणीही तयार नाही.

Web Title: Due to fear the mantralaya co-operative women underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.