नशाखोरी आणि वाईट संगतीमुळे ‘त्यांनी’ रक्ताच्या नात्यालाही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 07:00 AM2021-10-24T07:00:00+5:302021-10-24T07:00:07+5:30

Nagpur News वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

Due to drug addiction and bad company, ‘they’ also ended the blood relationship | नशाखोरी आणि वाईट संगतीमुळे ‘त्यांनी’ रक्ताच्या नात्यालाही संपविले

नशाखोरी आणि वाईट संगतीमुळे ‘त्यांनी’ रक्ताच्या नात्यालाही संपविले

Next
ठळक मुद्देव्यभिचार, नशाखोरीचे दुष्परिणाम गुन्ह्यांमध्ये होत आहे वाढ

नरेश डोंगरे

नागपूर : वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. अलीकडे अशा घटनांमध्ये सर्वत्र सारखी वाढ होत असून नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. (Due to drug addiction and bad company, ‘they’ also ended the blood relationship)

एमआयडीसी पोलीस स्टेशन

सोळाव्या वर्षीच तिला मित्रांचा नाद लागला. अमली पदार्थांचे व्यसनही जडले. त्यातून तिने घर सोडले आणि मित्रांसोबत राहू लागली. व्यसनपूर्तीसाठी पैसे मिळेनासे झाल्यामुळे तिने आपल्या आजीचे घर गाठले. मित्राच्या मदतीने आजीची हत्या केली. तिचे सोने तसेच रोख रक्कम घेऊन ती पळून गेली. मात्र, पोलिसांनी तिच्या अखेर मुसक्या आवळल्या.

 वाडी पोलीस स्टेशन

वर्षभरापूर्वी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. अल्पवयातच तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर ती प्रियकराला घरात बोलवून त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करू लागली. एक दिवस अचानक बारा वर्षांचा भाऊ घरी धडकला. त्याने बहीण आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. तो आता आई-वडिलांना सांगणार म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने छोट्या भावाची हत्या केली.

कपिल नगर पोलीस स्टेशन

दहावीत असलेला तो मित्राच्या वाईट संगतीमुळे मोठ्या माणसासारखा वागू लागला. आई, बहिणीला धमकावू लागला. घरात बहिणीचा मित्र येतो, ही बाब त्याला नेहमी खटकत होती. म्हणून त्याने बहिणीच्या मित्राशी वाद घातला आणि त्याची हत्या केली.

 हुडकेश्वर पोलीस स्टेशन

घरची आर्थिक स्थिती अतिशय चांगली. एकटा मुलगा म्हणून त्याचे लहानपणापासून कोडकौतुक होऊ लागले. त्याला जे पाहिजे ते करण्याची वडिलांनी मुभा दिली. तो जिममध्ये गेला आणि त्याने चांगले पीळदार शरीर कमाविले. नंतर मात्र त्याला व्यसन जडले. तो चक्क इंजेक्शन टोचून घेऊ लागला. व्यसन केल्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागले. एक दिवस त्याने स्वतःच्या वडिलांचीच निर्घृण हत्या केली.

 

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

व्यसनामुळे माणसाचे स्वतःवरचे संतुलन संपते.

अमली पदार्थांचे व्यसन जडल्यामुळे माणसाचा मेंदू चांगले काय, वाईट काय याबाबत फारसा विचार करत नाही. नशापूर्ती हेच एकमेव उद्दिष्ट त्याच्यासमोर असते आणि नशा चढली की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण संपते. या अवस्थेत तो कोणाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.

वाईट संगतीचा परिणाम वाईटच

आपण ज्यांच्यासोबत राहतो ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यापासून दूरच राहिले पाहिजे. अन्यथा आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचे भान संबंधित व्यक्तीला उरत नाही. वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो त्यांचे अनुकरण करतो आणि एखादा मोठा गुन्हा करून बसतो.

---

Web Title: Due to drug addiction and bad company, ‘they’ also ended the blood relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.