शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सीओपीडीमुळे दर १० सेंकदाला एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:05 IST

‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. यामुळे फुफ्फुसाचा झटका येऊ शकतो. जगभरात मृत्यू होण्याच्या कारणामध्ये सीओपीडी आजार तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिणामी, या आजाराला जागरूकतेची गरज आहे.

ठळक मुद्देधूम्रपान, प्रदूषण ठरतेय कर्दनकाळ : सीओपीडी तिसऱ्या क्रमांकाचा आजारजागतिक सीओपीडी दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. यामुळे फुफ्फुसाचा झटका येऊ शकतो. जगभरात मृत्यू होण्याच्या कारणामध्ये सीओपीडी आजार तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिणामी, या आजाराला जागरूकतेची गरज आहे.नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार हा दिवस जागतिक सीओपीडी दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने श्वसनविकार तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. तज्ज्ञांच्या मते, देशात १९७१ मध्ये ‘सीओपीडी’ असलेल्या रुग्णांची संख्या ६५ लाख होती. २०१४ मध्ये यात दुपटीने वाढ झाली. एक कोटी चाळीस लाख या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली, तर अवघ्या दोन वर्षात तीन कोटी भारतीय सीओपीडी आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. नागपूर शहरात छातीरोग तज्ज्ञांची संख्या ३० च्यावर आहे. प्रत्येकांकडे रोज सुमारे १० नवीन रुग्ण येत असल्याचे गृहित धरल्यास रोज ९० रुग्णांवर उपचार होत असावेत, ही धक्कादायक आकडेवारी आहे.फुफ्फुसाचा आजार‘सीओपीडी’ हा एक फुप्फुसाचा आजार आहे. त्यामध्ये फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. निदान वेळेत झाले नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. सीओपीडी हा वाढणारा आजार आहे आणि परिणामी तो जुना झाल्यास घातक ठरतो. ‘सीओपीडी’ बरा होत नाही, पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

घराघरातून निघणारा धूरही धोकादायकसीओपीडी नेहमी धूम्रपान करणाऱ्यांचा आजार म्हणून ओळखला जातो. परंतु ८० टक्क्यांहून जास्त घरांमध्ये बायोमास इंधनाचा उपयोग केला जातो. घराघरातून निघणारा हा धूर सीओपीडीला कारणीभूत ठरत आहे. यात ३२ टक्के शहरी भागांमध्ये अजूनही स्टोव्हचा वापर होतो. २२ टक्के जळाऊ लाकूड तर ८ टक्के केरोसीन वापरतात. याचा धूर विशेषत: गृहिणींसाठी धोकादायक ठरत आहे.सीओपीडीची लक्षणे

  • ठसा सोबत किंवा ठसा विना खोकला असणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • श्वास घेताना घरघर किंवा सिटीसारखा आवाज येणे
  • छातीमध्ये जखडणे

धूम्रपान करणऱ्यांमध्ये तिपटीने वाढतो धोकाधूम्रपान करणाऱ्यांमध्ये ‘सीओपीडी’चा धोका निर्माण करण्यामागील धोकादायक घटकांपैकी एक आहे. सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चार जणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ होण्याचा धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांना ‘सीओपीडी’ होण्याचा धोका तिप्पट असतो, तर धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा दमा होतो आणि त्यातील अर्ध्याअधिक लोकांना ‘सीओपीडी’ होतो.डॉ. अशोक अरबटश्वसनविकार तज्ज्ञस्त्री-पुरुष दोघांमध्येही आजार‘सीओपीडी’ हा आजार पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही अधिक प्रमाणात दिसून येतो. शहरी महिलांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये धूम्रपानाची सवय वाढू लागली आहे. परिणामी हे काळजीचे कारण बनले आहे. त्याचबरोबर हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयरोग आणि आॅस्ट्रिओ स्पोरोसिसमुळेही नंतर सीओपीडी होऊ शकतो.डॉ. आकाश बल्कीश्वसनविकार तज्ज्ञ

 

टॅग्स :Smokingधूम्रपानHealthआरोग्य