शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

थकबाकी वसुलीत नागपूर मनपाचा कर विभाग थकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:52 IST

महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ७३ कोटींची वसुली झाली होती. ३२० कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी जेमतेम ११ कोटींचीच वसुली झाली आहे.

ठळक मुद्दे३२० कोटींपैकी ११ कोटींचीच वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ७३ कोटींची वसुली झाली होती. ३२० कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी जेमतेम ११ कोटींचीच वसुली झाली आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. यात विभागाने दिलेल्या माहितीनुसार ५ लाख ६० हजार मालमत्तांपैकी ३ लाख २० हजार डिमांड वाटप करण्यात आले. दोन लाख ७० हजार मालमत्ताधारकांना अद्याप डिमांड मिळालेल्या नाहीत. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सर्वेक्षणानंतरची नवीन मालमत्तांची माहिती सादर करण्याचे निदेंश दिल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. स्थायी समितीने ५०९ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. याचा विचार करता वसुली कमी आहे. मार्चअखेरीस यात अपेक्षित वाढ होईल. गेल्या वर्षी अभय योजना राबविण्यात आली होती. त्यानंतरही सप्टेंबरअखेरीस ७३ कोटींची वसुली झाली होती. त्यातुलनेत यंदा ११ कोटी अधिक वसुली झालेली आहे. म्हणजेच वसुलीकडे लक्ष आहे. परंतु जुनी थकबाकी वसलू करण्याचे निर्देश देण्यात आले. जे थकबाकी भरणार नाहीत, त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावात काढण्याचे निर्देश दिले आहेत. याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. ई-गव्हर्नन्स प्रणालीकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या महिनाभरात कर विभागाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. डिमांड वाटपात अडचणी येत असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. यावर तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वसुलीत सतरंजीपुरा मागेमहापालिकेच्या वसुलीचा झोननिहाय विचार करता सतरंजीपुरा वसुलीत सर्वात मागे आहे. या झोनची सप्टेंबर अखेरीस २.६५ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ३.८७ कोटींची वसुली करण्यात आली होती. मेयो रुग्णालयाला १.५० कोटीची डिमांड पाठविण्यात आली आहे. या कराची वसुली झाली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली अधिक होणार आहे.मालमत्ता कराची झोननिहाय वसुली (कोटीत)झोन               रक्कमलक्ष्मीनगर       १३.७०धरमपेठ          १४.०५हनुमाननगर    ०८.७१धंतोली             ०७.२७नेहरूनगर       ०६.२४गांधीबाग        ०३.४०सतरंजीपुरा     ०२.६५लकडगंज       ११.३१आसीनगर      ०६.१३मंगळवारी        ११.००

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर