महाराष्ट्र एक्सप्रेसमधून मादक पदार्थांची बॅग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:51+5:302021-06-02T04:08:51+5:30
नागपूर : महाराष्ट्र एक्सप्रेसमधून मंगळवारी सायंकाळी मादक पदार्थांनी भरलेली एक बॅग जप्त करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाला यात ब्राऊन ...

महाराष्ट्र एक्सप्रेसमधून मादक पदार्थांची बॅग जप्त
नागपूर : महाराष्ट्र एक्सप्रेसमधून मंगळवारी सायंकाळी मादक पदार्थांनी भरलेली एक बॅग जप्त करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाला यात ब्राऊन शुगर असल्याची शंका आहे. नार्कोटिक्स विभागाच्या चमूने तपासणी केल्यानंतरच यात नेमका कुठला मादक पदार्थ आहे हे स्पष्ट होऊ शकेल.
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आरपीएफची पेट्रोलिंग चमू गस्त घालत होती. त्यावेळी स्लीपर कोचमध्ये चमूला बेवारस स्थितीत बॅग आढळली. बॅगेत स्फोटके असल्याच्या संशयावरून तातडीने नागपूर आरपीएफला सूचना देण्यात आली. गाडी सायंकाळी चार वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर नागपूर आरपीएफच्या चमूने सतर्कतेसह बॅग फलाट क्रमांक एकवर आणली. बॅग उघडल्यानंतर त्यात प्लास्टिकच्या लहान पुड्या मिळाल्या. प्रथमदर्शनी या पुड्या ब्राऊन शुगरच्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती आरपीएफ कमांडेंट आशुतोष पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली. नेमका कुठला मादक पदार्थ आहे, याची तपासणी करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाच्या चमूला नागपूर रेल्वे स्थानकावर येण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतरदेखील बराच वेळ चमू स्थानकावर आलीच नाही. तपासणीची किटच नसल्याने उशीर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.