शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या आमसभेवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:55 IST

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीवरून जिल्हा परिषदेची बुधवारी होणाऱ्या आमसभेवर दुष्काळाचे सावट घोंगावणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी : केसिंग पाईपचा मुद्दाही गाजणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीवरून जिल्हा परिषदेची बुधवारी होणाऱ्या आमसभेवर दुष्काळाचे सावट घोंगावणार आहे.राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील पावणे दोनशेहून अधिक तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे घोषित केले आहे. यात नागपुरातील काटोल, कळमेश्वर आणि नरखेड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळाची गंभीरता नेमकी कशी मोजली आणि दुष्काळ मंडळे कोणत्या निकषांवर स्थापित केली अशा सगळ्या मुद्यांवर विरोधक प्रश्नांची सरबत्ती करणार आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे म्हणाले हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यंदा विदर्भात ९२ टक्के पाऊस झाला आहे. परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही. जिल्ह्यात सर्वदूर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचा पूर्णपणे सत्यानाश होण्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी बोंडअळीचा फटका असूनसुद्धा सर्वसाधारण शेतकऱ्याने किमान १० क्विंटल कापूस पिकविला होता. यंदा हा आकडा दोन क्विंटलवर येऊन ठेपला आहे. सरकारने तीन तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. कळमेश्वर आणि काटोल येथे तीव्र आणि नरखेडमध्ये मध्यमस्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारने केवळ तीनच तालुक्यात दुष्काळ का घोषित केला. सरकारने शेतकºयाला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आम्ही या आमसभेदरम्यान करणार आहोत.सोबतच बोअरवेलसाठी लागणाऱ्या केसिंग पाईपसाठी राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त होते. या पाईप्सच्या खरेदीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते असे आता निदर्शनास आले आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून जि.प.ने विनापरवाना ही खरेदी केली आहे. ही खरेदी अवैध होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.१८ कोटीच्या वसुलीसंदर्भात ठरावजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींचे १८ कोटी रुपये अडकले आहेत. काही सदस्यांनी हा मुद्दा उचलला आहे. यात जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचे ११.७८ कोटी, तर ग्रामपंचायतींचे सहा कोटी रुपये असल्याची माहिती आहे. यासंदर्भात अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते. जि.प.च्या सेसफंडातील ११.७८ कोटी रुपये जि.प. ला परत करावेत यासाठी आमसभेत ठराव घेतला जाणार असल्याची सांगितले जात आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरdroughtदुष्काळ