शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

हवालदाराला बोनेटवर पळवून नेणाऱ्या कारचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांना कारच्या बाेनेटवर बसवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांना कारच्या बाेनेटवर बसवून दुचाकींना धडक मारत समोर जाणारा आरोपी आकाश चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी देशमुख या दोघांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे.

रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सक्करदरा चौक ते राजे रघुजी मार्गावर हे थरारनाट्य घडले होते.

वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून पुढे जात असलेल्या आरोपी चव्हाणची कार हवालदार अमोल यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. तो थांबत नसल्याचे पाहून हवालदार अमोल कारसमोर उभे झाले. चव्हाणने त्यांना न जुमानता तशाच अवस्थेत कार दामटली. हवालदार अमोलही बोनेटवर चढले. त्या अवस्थेत सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत चव्हाणने आपली कार दामटत काही दुचाकींना धडक मारली. वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली. नंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. ताे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी आहे.

---