चाकूच्या धाकावर कारचालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST2021-03-25T04:08:54+5:302021-03-25T04:08:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : कारमधून आलेल्या चार अज्ञात आराेपींनी कारचालकास मारहाण करीत जखमी केले. शिवाय, आराेपींनी चाकूच्या धाकावर ...

The driver was robbed at knife point | चाकूच्या धाकावर कारचालकास लुटले

चाकूच्या धाकावर कारचालकास लुटले

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुटीबाेरी : कारमधून आलेल्या चार अज्ञात आराेपींनी कारचालकास मारहाण करीत जखमी केले. शिवाय, आराेपींनी चाकूच्या धाकावर कारचालकाकडील ४५ हजार रुपये किमतीची साेनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबाेरी-चंद्रपूर मार्गावरील खैरी शिवारात मंगळवारी (दि.२३) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

मुकेश महेश्वर कुवर (३८, रा. प्लाॅट नं. सी-१०१, रचना सायनतारा अपार्टमेंट) असे जखमी कारचालकाचे नाव असून, त्यांच्यावर नागपुरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुकेश कुवर व त्यांच्या कार्यालयात काम करणारी सहायक भक्ती अग्निहाेत्री यांच्यासह एमएच-१२/जेयू-०६०५ क्रमांकाच्या कारने चंद्रपूर राेडने जात हाेते. दरम्यान, खैरी शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-४९/यू-३४९९ किंवा ४५९९ क्रमांकाच्या कारमधील अज्ञात चार आराेपींनी कारसमाेर येऊन मुकेश कुवर यांना खाली उतरविले. आराेपींनी कुवर यांना दमदाटी करीत हातबुक्क्यांनी मारहाण केली. अशात चारपैकी एकाने धारदार चाकूने कुवर यांच्या छातीखाली वार करून त्यांना जखमी केले व त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची साेन्याची चेन हिसकावून आराेपींनी पळ काढला.

जखमी मुकेश कुवर यांनी लगेच बुटीबाेरी पाेलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३९७, ३४, सहकलम ४/२५ हत्यार अधिनियमान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक माणिक चाैधरी करीत आहेत.

Web Title: The driver was robbed at knife point