ट्रॅक्टरवरून पडून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:26 IST2020-12-04T04:26:52+5:302020-12-04T04:26:52+5:30

कन्हान : ट्रॅक्टरवरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

The driver died after falling from the tractor | ट्रॅक्टरवरून पडून चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टरवरून पडून चालकाचा मृत्यू

कन्हान : ट्रॅक्टरवरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेली शिवारात मंगळवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. प्रदीप नितनवरे (२६, रा. बाेरडा) असे मृताचे नाव आहे. मृत प्रदीप हा मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन जात असताना वाघाेली गावाजवळ ट्रॅक्टर दगडावर चढल्याने ताे खाली पडला. त्यात प्रदीपला गंभीररीत्या दुखापत झाली. जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यास बाेरडा येथील घरी आणून साेडले. दरम्यान, बुधवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कन्हान पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुणालयात पाठविला. त्यानंतर सायंकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: The driver died after falling from the tractor