शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

रंगकर्मी राम म्हैसाळकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:24 AM

संगीत नाटकांची समृद्धी विदर्भाच्या भूमीत रुजविणारे एकमेव रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, शुभदा देशपांडे व अरुंधती गिरणीकर या दोन मुली व मुलगा भवन व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता २८, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड या त्यांच्या निवासस्थानाहून निघेल व त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ठळक मुद्देसंगीत नाटकांचा अध्वर्यू लोपला : मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संगीत नाटकांची समृद्धी विदर्भाच्या भूमीत रुजविणारे एकमेव रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, शुभदा देशपांडे व अरुंधती गिरणीकर या दोन मुली व मुलगा भवन व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता २८, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड या त्यांच्या निवासस्थानाहून निघेल व त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.मूळचे अचलपूर येथील रहिवासी डॉ. राम म्हैसाळकर हे व्यवसायाने डॉक्टर होते. मात्र वडिलांप्रमाणेच नाटकांची आवड त्यांना होती. स्वत: उत्तम गायक आणि संगीत नाटकांबद्दलची जाण असलेला हा कलावंत. त्या काळी संगीत नाटक बसविणे व ते सादर करणे हे परिश्रमाचे आणि खर्चाचेही काम होते. मात्र डॉ. म्हैसाळकर यांनी ‘नाट्यवलय’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून स्वखर्चाने संगीत नाटकांची मेजवानी वैदर्भीय प्रेक्षकांना दिली. या माध्यमातून संगीत सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, स्वयंवर, शारदा, शाकुंतलम्, मत्स्यगंधा अशा लोकप्रिय अशा संगीत नाटकांचे प्रयोग राज्य व राज्याबाहेर सादर केले. १९५० ते १९८५-८६ पर्यंतचा काळ त्यांनी संगीत नाटकांनी गाजविला. संगीत नाटकांच्या माध्यमातून कल्याणी देशमुख, अनिरुद्ध देशपांडे, काका जोगळेकर असे मातब्बर गायक कलासृष्टीत निर्माण केले. परीक्षक, सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ‘संगीत वहिनी’, ‘दूरचे दिवे’ या नाटकांसाठी त्यांनी प्रथम पुरस्कारही प्राप्त झाले होते. ‘थँक्यू मिस्टर ग्लॅड’, ‘बेइमान’ आदी नाटकांचे दिग्दर्शन तर ‘संत धीरवीर पुरुष पहा’ व ‘अत्तर’ या नाटकांचे लेखनही त्यांनी केले होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या सर्व कवितांचा भावानुवाद करणारे ते एकमेव अन्यभाषी भारतीय होते. ते रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते व संघाची प्रार्थना उत्तम पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा लौकिक होता.डॉ. राम म्हैसाळकर यांच्या निधनाने विदर्भाच्या भूमीतील संगीत नाटकांचा अध्वर्यू लोपल्याची भावना ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर आंबोणे यांनी, नाट्यवलय संस्थेमध्ये त्यांच्यासोबत काम केल्याचे सांगत संगीत नाटकांसाठी स्वत:ला वाहून घेतलेला मोठा कलावंत गमावल्याची संवेदना व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी श्रद्धा तेलंग यांच्या ‘किचकवध’ या पदार्पणाच्या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. म्हैसाळकर यांनी केले होते. त्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाल्याची संवेदना व्यक्त केली.

 

टॅग्स :Deathमृत्यूNatakनाटक