विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना ‘डॉ. एस.एस.गडकरी’ पुरस्कार जाहीर
By आनंद डेकाटे | Updated: September 30, 2024 17:10 IST2024-09-30T17:08:23+5:302024-09-30T17:10:05+5:30
Nagpur : शेत पिकांच्या नुकसानीचे ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीचे फोटो घेवून गोळा केली अचूक माहिती

'Dr. S.S. Gadkari' Award announced to Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेचा लोक प्रशासनातील नवोपक्रमासाठी दिला जाणारा या वर्षीचा ‘डॉ. एस.एस.गडकरी’ पुरस्कार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना जाहीर झाला आहे.
नागपूर विभागात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीची पारंपारिक पध्दतीने नोंद केल्या जात होती. पंचनामा अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन बिदरी यांनी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग एप्लिकेशन सेंटरच्या मदतीने एक ॲप विकसीत केले आहे. या ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीचे फोटो घेवून अचूक माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे. ही अभिनव संकल्पना प्रायोगिक स्तरावर नागपूर विभागात राबविण्यात आली आहे. ई-पंचनामा या उपक्रमामुळे नुकसानीसंदर्भात अचूक माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे. ही पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संकल्पनेची दखल घेवून भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे बिदरी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.
विजयलक्ष्मी बिदरी यांची अमेरिका येथील विशिष्ट हॅम्फ्रे फेलोशिपसाठी निवड झाली आहे. बिदरी यांना प्रशिक्षणानंतर धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात येईल. असेही क्षत्रिय यांनी सांगितले.