डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी माेर्चा साेमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:13 IST2021-08-28T04:13:12+5:302021-08-28T04:13:12+5:30

मनपा व एमटीडीसी यांचे संगनमत डाॅ. आंबेडकर भवन पाडण्यात आले असून, आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याविरोधात सर्व आंबेडकरी ...

Dr. Saturday for Ambedkar Cultural Building | डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी माेर्चा साेमवारी

डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी माेर्चा साेमवारी

मनपा व एमटीडीसी यांचे संगनमत डाॅ. आंबेडकर भवन पाडण्यात आले असून, आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याविरोधात सर्व आंबेडकरी पक्ष व संघटना एकवटल्या असून, ३० ऑगस्ट रोजी संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बाळू घरडे यांनी दिली. गत अनेक वर्षांपासून यशवंत स्टेडियम प्रस्तावित डाॅ. आंबेडकरांचे स्मारक थंडबस्त्यात आहे आणि तयार भवन तोडण्याचा प्रताप करण्यात आला. पूर्वीच्याच जागेवर भवनाचे पुनर्निर्माण करावे व या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांची आहे. भवनाच्या निर्मितीसह दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रपरिषदेला प्रकाश कुंभे, धनराज दहाट, तारिकभाई, अरुण गजभिये व सूर्यभान शेंडे उपस्थित होते.

Web Title: Dr. Saturday for Ambedkar Cultural Building