डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 22:54 IST2022-06-13T22:50:26+5:302022-06-13T22:54:54+5:30
Nagpur News ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ८ जून रोजी पुणे येथे रुग्णालयात दाखल केले असून, त्यांना ल्युकेमियाचा त्रास असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल; ल्युकेमियाची शक्यता
नागपूरः ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ८ जून रोजी पुणे येथे रुग्णालयात दाखल केले असून, त्यांना ल्युकेमियाचा त्रास असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या आठवड्यात ८ जून रोजी डॉ. आमटे हे पुण्यात बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभासाठी आले असताना त्यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर केल्या जात असलेल्या उपचाराला सोमवारी त्यांनी थोडासा प्रतिसाद दिला आहे. त्यांना ल्युकेमिया झाला असावा अशी शक्यता असून, त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
अनिकेत आमटे यांचे आवाहन
डॉ. प्रकाश आमटे यांना आराम व उपचारांची गरज आहे. त्यामुळे सध्या त्यांना कुणी फोन वा मेसेज करू नये तसेच भेटायला येऊ नये असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे.