अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे 

By आनंद डेकाटे | Published: October 12, 2023 02:28 PM2023-10-12T14:28:54+5:302023-10-12T14:29:50+5:30

विविध विषयांवरील दहाहून अधिक पुस्तके मराठी व इंग्रजी भाषेत प्रका‍शित

Dr. Murahari Kele as the President of All India Budding Marathi Literature Association | अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे 

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे 

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे ३० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या १४ ऑक्टोबर रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांची निवड सर्वानुमते केली असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक शरद गोरे यांनी कळविले आहे.

या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले असून संमेलनाचे उद्घाटन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. द. मा. मिरासदार, नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, शिवाजी सावंत, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, गंगाधर पानतावणे, आ. ह. साळुंखे, नरेंद्र जाधव, भास्कर चंदनशिव, श्रीपाल सबनीस यांसारख्या नामवंत साहित्यिकांनी सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषवल्याचे निमंत्रकांनी कळवले आहे. 

संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे हे मागील तीस वर्षांपासून साहित्य लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेले ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे वडिलांचे चरित्र व ‘नानी’ हे आईचे चरित्र प्रसिद्ध आहे. यासह त्यांची विविध विषयांवरील दहाहून अधिक पुस्तके मराठी व इंग्रजी भाषेत प्रका‍शित झालेली असून, ‍अनेक दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्रांतही त्यांनी विपुल लेखन केलेले आहे.

Web Title: Dr. Murahari Kele as the President of All India Budding Marathi Literature Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.