डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:13+5:302021-02-06T04:14:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द ...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन तातडीने करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करण्यात आली. आता वर्ष होत आहे; परंतु नवीन सदस्यांची नेमणूक झालेली नाही. परिणामी खंड प्रकाशनाचे काम ठप्प पडले आहे. त्यामुळे सदस्यांची नेमणूक करून समितीचे पुनर्गठण तातडीने करा, अशी मागणी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच निवेदन सादर केले.
या प्रकाशन समितीला पूर्वीची वार्षिक तीन कोटी रुपयांची बजेटची तरतूद पुन्हा लागू करावी, प्रती संपलेल्या खंडाचे पुनर्मुद्रण करावे, प्रकाशित मराठी खंडाचा इंग्रजी व इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित करावा अशी मागणीही निवेदनाद्वारे केल्यायावर उच्च शिक्षण मंत्री सामंत यांनी येत्या आठ दिवसात समितीचे गठण होणार असल्याचे आश्वासन दिले.