डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:08 IST2020-12-08T04:08:03+5:302020-12-08T04:08:03+5:30

.... ग्रामपंचायत खरसाेली नरखेड : खरसोली ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ...

Dr. Greetings to Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

....

ग्रामपंचायत खरसाेली

नरखेड : खरसोली ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सरपंच नीलम नरेश अरसडे यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी उपसरपंच रागिणी बांदरे, ग्रा.पं. सदस्य ज्योती फुसे, सुनीता बरडे, दर्शना ठाकरे, सपना वानखेडे, कुंदा गजबे, भैया धुर्वे, भागवत चक्रपाणी, नीलेश राऊत, ब्रह्मानंद अरसडे, सचिव तितरमारे आदी उपस्थित होते.....

राष्ट्रवादी काँग्रेस कुही

कुही : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना नमन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे हाेत्या. यावेळी विनाेद हरडे, लीलाधर हरडे, लीलाधर धनविजय, सुरेश कुकडे, रमेश लांजेवार, रामभाऊ क्षीरसागर, कमलाकर भाेयर, वसंत पडाेळे, राजेंद्र मांढरे, विष्णू मांढरे, विष्णू मेहरकुळे, अनिल लांजेवार, पांडुरंग लेंडे, प्रमोद थोटे, तुलाराम धनजोडे, अमोल वासनिक, अक्षय बाभरे आदी उपस्थित हाेते. संचालन रमेश लांजेवार यांनी केले. आभार अक्षय बाभरे यांनी मानले.

Web Title: Dr. Greetings to Babasaheb Ambedkar